Take a fresh look at your lifestyle.

Monsoon Update : वरुणराजा बरसणार.. पुढील चार दिवस महत्वाचे, 13 जिल्ह्यांमध्ये जारी केला यलो अलर्ट

0

Yellow Alert : रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यात सर्वत्र ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता. मात्र तसं काही घडलं नाही. उलट पाऊस लांबणीवर गेल्याचं दिसत आहे. शेतकरी वर्गाने तर पाऊस वेळेत पडेल या आशेवर खरिपाची (kharif season) सर्व तयारी देखील केली.

मात्र आता हवामान खात्याकडून (IMD) काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert)जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने 6 ते 9 जूनपर्यंत या 13 जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस Rain येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

6 जून ते 9 जून या दरम्यान काही भागांमध्ये हवेचा दाब किंचित कमी होत असल्यामुळे राज्यातील 13 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे आता हवामान खात्याने या जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित राहण्याचा सूचनादेखील जारी केल्या आहेत.

राज्यात अजूनही उष्णतेची लाट :

सर्वसाधारणपणे 22 मे पर्यंत अंदमानमध्ये मान्सून दाखल होतो. मात्र यंदा हा मान्सून 16 मे रोजीच दाखल झाला. तसेच केरळमध्येही मान्सून चार दिवस अगोदर दाखल झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र मान्सूनचा वेग अरबी समुद्रात आल्यानंतर मंदावला. अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.