Take a fresh look at your lifestyle.

जाणून घ्या, जनावरांच्या विविध आजाराची लक्षणे

0

पावसाळा येतोय! जाणून घ्या, जनावरांच्या विविध आजाराची लक्षणे : नितीन रा.पिसाळ

जून महिन्याच्या सुरुवातीलाच सगळीकडेच पावसाच्या आगमनामुळे वातावरण अतिशय दमट, थंड व कमी अधिक उष्णतेचे बनते. या अचानक झालेल्या वातावरणातील बदलांना जुळवून घेणे जनावरांना अवघड जाते कारण उन्हाळ्यामुळे त्यांना उष्ण हवामानाची सवय झालेली असते. पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्याने गोठ्यात ओलावा राहतो व त्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव वाढून संसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढते. त्यामुळे जनावरे विविध रोगांना बळी पडतात त्यातच या काळात जनावरांच्या खाद्यात बदल झाल्याने पोटाचे विकार होतात तसेच जनावरे पावसात भिजतात गोठ्यात चिखल झाल्यामुळे किटकांचा उपद्रव होतो जनावरे खाली बसत नाहीत व त्यामुळे त्यांना आराम मिळत नाही व त्यामुळे रवंथपणा कमी होतो त्याचा तोटा दूध उत्पादनावर होतो.
जनावरांना आजार हे मुख्यता जिवाणू तसेच विषाणूंमुळे होतात तसेच जनावरे एकमेकाच्या संपर्कात आल्याने, श्वसनाद्वारे हवेतून, दुषित चारा-पाणी तसेच किटकांद्वारे रोग उद्भवतात. काही रोगजंतू हे बहुधा तोंडावाटे तसेच श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करतात.जनावरे आजारी पडण्याचे मुख्य कारण म्हणजे पशुपालकांना कोणत्या ऋतूमध्ये जनावरांना कोणते आजार होतात व त्याची नेमकी लक्षणे कोणती असतात हे माहित नसते किंवा पशुपालकांकडे जनावरांची संख्या कमी असल्याने काहीसे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्याकडे पशुपालनाच्या कुठल्याही नोंदी नसतात एक ढोबळ मानाने चारा उपलब्ध आहे या उद्देशाने ते व्यवसाय करतात. सध्यपरिस्थितीत दुग्धव्यवसाय हा खरं तर अडाणी व कामचुकार लोकांचा व्यवसाय राहिलाच नाही या व्यवसायामध्ये ज्यांच्याकडे आधुनिक माहिती व नवीन तंत्रज्ञान शिकण्याची जिज्ञासा आहे व पाठीशी अनुभवाचे भांडार आहे तेच लोक हा व्यवसाय उत्कृष्ट पद्धतीने आणि फायदेशीररित्या करू शकतात.

चला तर मग जाणून घेऊया…जनावरांच्या विविध आजाराची लक्षणे
१) बुळकांडी / हगवण-
जनावरास ताप येतो (१०४ ते १०६°F) तसेच डोळे खोल जातात.
जनावराने खाणे-पिणे बंद केल्याने अशक्त बनते.
जनावराच्या डोळ्यातून व नाकातून पाणी गळते.
जनावरे पाण्यासारखी जुलाब करतात तसेच शेणाचा घाण वास येतो.
डोळ्यातून व नाकातून पाणी येते तसेच शेण टाकताना जनावरांना त्रास होतो.
लवकर उपचार न केल्यास जनावर २४ तासात मृत्युमुखी पडते.
२) लाळ्या-खुरकत-
जनावराच्या शरीराचे तापमान (१०४ ते १०६°F) पर्यंत जाते.
जनावरे सुस्त होतात खात-पीत नाहीत.
जनावराच्या तोंडात व पायात जखमा होतात.
पायात फोड फुटल्याने जनावर लंगडते तसेच जास्त प्रादुर्भाव झाल्यास खूर निकामी होऊ शकते.
जनावर रवंथ करत नाही तसेच तोंडातून सततपांढरा फेस व लाळ गाळते.
तोंडाची आग-आग होते, डोळे लाल होऊन डोळ्यातून पाणी येते.
जनावर धापा टाकते तसेच उष्णता सहन होत नाही.
३) कासेचा दाह-
कासेला भरपूर सूज येते त्यामुळे जनावराला बसता येत नाही.
जनावराची कास गरम लागते तसेच हात लावल्यास भयंकर वेदना होतात परिणामी जनावर लाथा मारते.
दुधाचा रंग बदलतो तसेच दुधाला दुर्गंधीयुक्त वास येतो.
सुरवातीच्या दुधामधून दह्या सारख्या गुठळ्या येतात किंवा रक्तमिश्रित तसेच पू मिश्रित दूध देते.
कास दगडासारखी कडक बनते तसेच सडातून दूध येणे बंद होते.
जनावराच्या कासेत जास्त दिवस पू राहिल्यास कास फूटते.
४) घटसर्प-
जनावर अचानक आजारी पडते.
शरीराचे तापमान (१०५ ते १०६°F) पर्यंत जाते.
जनावराच्या नाकातून व तोंडातून चिकट स्राव वाहतो.
जनावर खाणे-पिणे बंद करते व सारखी लाळ गाळते.
घशावर सूज येते तसेच घशातून घरघर असा आवाज येतो.
जनावराला श्वसनाचा त्रास झाल्याने जनावर ७२ तासात मृत्युमुखी पडते.

५) फऱ्या- (एकटांग्या)
जनावराला अचानक ताप येतो (१०६ते १०८°F).
भूक मंदावते व रवंथ क्रिया थांबते तसेच जनावर सुस्त होते.
जनावराच्या पुढच्या किंवा मागच्या पायाच्या मांसल भागावर सूज येते.
सुजलेल्या भागात हाताने आपल्याच चरचर आवाज येतो.
सुजलेल्या भागावर छेद घेतल्यास गॅसयुक्त काळसर-पिवळसर खराब स्त्राव येतो.
जनावर लंघडते पाय जमिनीला टेकवत नाही.
तसेच लवकर उपचार न केल्यास जनावर दाखवते
६) थायलेरियासिस-
जनावरांच्या शरीराचे तापमान १०४ ते १०६°F) पर्यंत जाते.
हा आजार गोचीडांमुळे पसरतो.
जनावर खात-पीत नाही त्यामुळे दूध उत्पादन घटते.
जनावरे खाली बसतात उठत नाहीत तसेच तांबड्या रंगाची लघवी करते.
जनावरांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
जनावरांमध्ये ॲनिमिया, कावीळ, हगवण तसेच शेनात रक्ताच्या गाठी दिसतात.
रक्त तपासणीत थायलेरिया आजाराचे जंतू सापडतात.
७) बबेसिओसिस- (गोचीड ताप)
जनावराला खूप ताप येतो (१०५ ते १०७°F).
जनावराच्या तोंडाची त्वचा पांढरी पडते.
जनावरांना हा आजार गोचिडांच्या चाव्यामुळे होतो.
जनावरे कॉफी सारख्या रंगाची लघवी करतात.
गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.
जनावरांमध्ये ॲनिमियाची लक्षणे दिसतात.
अशक्तपणा वाढून जनावरे ताणतणावाखाली जातात
गाई म्हशी स्वस्त पडतात तसेच दूध उत्पादनात घट येते.
८) ब्रुसेलोसिस-
गाभण जनावराचा ६ महिन्याच्या कालावधीनंतर गर्भपात होतो.
कमी दिवसाचे अशक्त व पूर्ण वाढ न झालेले वासरू जन्माला येते.
गर्भपात झाल्यास जनावराच्या योनीमार्गातून पिवळसर पांढऱ्या रंगाची दुर्गंधीयुक्त घाण येते.
गाई म्हशींमध्ये गाभण राहण्यास अडचणी निर्माण होतात.
रोगाचे निदान करण्यासाठी जनावरांची रक्त तपासणी करून घ्यावी.
९) किटोसीस-
जनावर खात-पीत नाही त्यामुळे अशक्त बनते.
दूध बेचव लागते तसेच दूध उत्पादनात घट येते.
जनावराचे वजन कमी होते.
जनावराला अधून-मधून झटके येतात तसेच तोंडाला फेस येतो.
जनावर दात कराकरा खाते वेड्यासारखे करते तसेच अंग अचानक टाकून देते.
जनावराचे शेन लेंडी सारखे पडते.
१०) तिवा-
जनावराच्या अंगात 3 दिवस ताप असतो म्हणून त्याला तिवा म्हणतात.(१०४- १०७ oF
जनावर पायाने लंगडते किंवा अडखळत चालते.
जनावर चारा खाणे व रवंथ करणे बंद करते त्यामुळे दूध उत्पादन घटते.
जनावर अंग टाकून देते, थरथर कापते किंवा दात कराकरा खाते व बसून राहणे पसंत करते.
नाकातून स्त्राव व डोळ्यातून व तोंडातून पाणी गळते.
गोठ्यात कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यास या जनावरे या रोगास बळी पडतात.
११) मिल्क फिवर-
जनावर खात-पीत नाही तसेच शरीराचे तापमान नेहमीपेक्षा कमी होते. (९७ ते ९८°F).
जनावराला उभे राहता येत नाही तसेच अडखळत चालते किंवा खाली पडते.
हृदयाची क्रिया मंदावते तसेच जनावर मृत झाल्यासारखे एका बाजूला पडलेले असते.
जनावराचे शरीर थरथर कापते, पोट दुखते तसेच शेण बाहेर टाकत नाही.
जनावराच्या रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण अचानक कमी झाल्याने ही लक्षणे आढळतात.
जनावराला लवकर उपचार न केल्यास जनावर तडफडून मरते.
१२) पोटफुगी-
जनावर खात-पीत नाही तसेच रवंथपणा बंद करते.
रवंतपणा बंद झाल्याने जनावरांचे पोट लवकर फुगते.
जनावर सारखे ऊठ-बस करते तसेच पाय व पोट तानते.
जनावराचे पोट डाव्या बाजूला फुगलेले दिसते.
जनावरे पोटावर लाथा मारतात तसेच पाय झटकतात.
जनावर गाभण असेल तर वासरू मृत्युमुखी पडते.
श्वासोच्छवासात अडथळा आल्याने जनावराला खूप त्रास होतो परिणामी मृत्यू देखील संभवतो.

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील आधुनिक माहिती व डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोअर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]

https://krushidoot.com

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues