Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना संपूर्ण माहिती

0

शेतकरी बंधूंनो, या योजनेची माहिती आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकेल. आपल्या शेतात सततच्या विजेच्या समस्यांमुळे आपण आपल्या शेतात सौर पंप स्थापित करण्याचा विचार करीत असाल हि योजना तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकर्‍यांसाठी भरपूर योजना राबविल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने योजनेसाठी अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना :

शेतातील विजेची समस्या असलेल्या कोणत्याही शेतकऱ्यासाठी आणि विजेमुळे जे शेतकरी शेताला पाणी देऊ शकत नाही अश्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंपामार्फत आपल्या शेतातील विजेच्या नियमित होणाऱ्या समस्येपासून आपण मुक्त होऊ शकता.

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

https://www.mahadiscom.in/solar या वेबसाइटला भेट द्या
तिथे आपल्याला ए – 1 फॉर्म मिळेल, त्या फॉर्मवर आपल्याला सर्व माहिती योग्य मार्गाने भरावी लागेल.
ए -1 फॉर्मसह आपल्याला आपली काही (खाली दिलेली) कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.

योजनेसाठी साठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

आपल्या शेतीचा 7/12
आधार कार्ड
आपले जात प्रमाणपत्र
(आपल्या जमीनीच्या 7/12 दस्तऐवजावर आपण ज्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप स्थापित करता आहात ते 7/12 वर पोस्ट करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे विहीर असेल तर विहीरचा क्रमांक आपल्या ७/१२ दस्तऐवजात असला पाहिजे.)
ए -1 फॉर्मसोबत घोषणापत्र आणि आपली सही असली पाहिजे.
यानंतर आपल्याला ते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे पूर्ण असतील तर आपल्याला संबंधितांकडून पुढील बाबींसाठी कळवण्यात येईल.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues