Take a fresh look at your lifestyle.

धेनु ॲप च्या मदतीने पशुपालकही करू शकतील निदान

1

आता धेनु ॲप च्या मदतीने पशुपालकही करू शकतील जनावरांच्या रोगाचे निदान | नितीन रा.पिसाळ

दुभत्या जनावरांपासून अधिक दूध उत्पादन मिळवण्यासाठी जनावरांचे उत्तम संगोपन व चांगली निगा राखणे खूप आवश्यक असते. त्यातच आपल्या गोठ्यात आजारी जनावरे असणेही ही चिंतेची तसेच तोट्याची बाब असते. जनावरे आजारी पडण्याचे मुख्य कारण म्हणजे पशुपालकांना कोणत्या ऋतूमध्ये जनावरांना कोणते आजार होतात व त्याची कारणे काय आहेत हे माहित नसते किंवा जनावरांची संख्या कमी असल्याने काहीसे दुर्लक्ष केले जाते.परंतु दुग्धव्यवसाय फायदेशीर करण्यासाठी जनावरांचे आजार व आहाराकडे दुर्लक्ष करून चालत नाही जर चुकून दुर्लक्ष झाले तर पशुपालकांना त्याचा मोठा तोटाच सहन करावा लागतो त्यावेळी दुग्धव्यवसाय तोट्यात जाण्याची जास्त शक्यता असते.

               पशुपालकांच्या या काही चुकांमुळे दुग्धव्यवसाय उध्वस्त झालेले आहेत परंतु लोकांची रीत आहे दुसऱ्याच्या सांगण्यावरून व्यवसाय करणे आणि त्यात गरज नसतानाही सारखे बदल करणे. गावाकडे तोट्यात गेलेले शेतकरी इतर पशुपालकांना फायद्याच्या गोष्टी कमी आणि तोट्याच्याच गोष्टी जास्त सांगतात त्यामुळे काही पालक तरुणांना या व्यवसायात उतरण्यास रोखून धरतात व त्यांची मान नोकरीकडे वळवतात. उच्चशिक्षित तरुणांनी मोबाइलद्वारे दुग्ध व्यवसायातील आधुनिक माहिती जाणून घेऊन धेनू ॲप सारख्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे हा दुग्ध व्यवसाय केला तर नक्कीच नोकरीपेक्षा जास्त पगार मिळवून आर्थिक स्थैर्यता साधता येईल. कारण पशुपालकांकडे माहिती व तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने दुग्धव्यवसाय करत असताना भरपूर चुका होतात आणि त्या चुकांमुळेच दूध व्यवसायात तोटा होतो. ज्या पशुपालकांचे गोठे फायद्यात असतात त्यांनी गोठा व्यवस्थापनाच्या सर्व बारीक गोष्टींचा खूप अभ्यास केलेला असतो त्यामुळे त्या चुका ते परत परत करत नाहीत त्यांना काही दिवसांनंतर चांगल्या व्यवस्थापनाची सवयच लागून जाते त्यामुळे त्यांच्या गोठ्यात शाश्वत दूध उत्पादन मिळते. 

                सध्याच्या काळामध्ये पारंपारिक पद्धतीने दुग्धव्यवसाय केला तर उत्पादन कमी आणि खर्च जादा होतो त्यामुळे दुग्धव्यवसाय करताना धेनु ॲप चा पुरेपूर  वापर करून आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाची जर जोड दिली  तर नक्कीच कमी दिवसात हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. धेनु ॲप मध्ये जनावरांच्या प्रत्येक रोगाचे  फोटो तसेच  कारणे, लक्षणे व त्यावर उपाययोजना काय कराव्यात या संबंधित सध्या सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली आहे त्यावरून आपण जनावरांना कोणते रोग झाले आहेत ते सहज ओळखून निदान करू शकता व आपला गोठा निरोगी ठेवू शकता.

पशुपालकांनों!! जाणून घ्या…जनावरांच्या रोगाचे निदान कसे करावे?

१) प्रथम जनावरांच्या शरीराचे तापमान मोजावे साधारणतः सामान्य तापमान (१०१°F) असते
२) जनावरांच्या शरीराचे तापमान कमी झाल्यास मिल्क फिवर किंवा विषबाधा होऊ शकते.
३) जनावराच्या हृदयाचे तसेच नाडीचे ठोके कमी जास्त होतात का ते पाहावे.
४) जनावर धापा टाकतेय का तसेच श्‍वसनाची गती कमी-जास्त होतेय का याकडे लक्ष दयावे.
५) डोळे निळे पडल्यास जनावरांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे असे समजावे.
६) डोळे पिवळे पडल्यास कावीळ किंवा यकृताची संबंधित आजार आहे हे गृहीत धरावे.
७) डोळे पांढरे पडल्यास जनावरांमध्ये ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता आहे लक्षात येते.
८) डोळे लाल झाल्यास जिवाणूजन्य तसेच विषाणूजन्य आजाराची शक्यता असते.
९) डोळ्याचे बुबुळ पाणीदार व चमक असल्यास थायलेरिओसिस या रोगाची शक्यता असते.
१०) जनावराचे डोळे खोल गेल्यास शरीरातील पाणी कमी झाले आहे याचा अंदाज येतो.
११) जनावरांमध्ये आजाराची शंका वाटल्यास जनावर थोडे चालवून पाहावे.
१२) जनावराची चारही पायावर उभे राहण्याची स्थिती, वागणूक किंवा हालचाल पहावी.
१३) जनावराचे पोट फुगलेले तसेच खाली सुटलेले आहे का व ते आकुंचन व प्रसरण पावतेय का ते पाहावे?
१४) तोंडातून रक्त, लाळ, पाणी, फेस, येतोय का तसेच तोंडातील फोड व जखमांची पाहणी करावी.
१५) जनावराचे डोळे, कान, नाकपूडी व गुदद्वारची पाहणी करावी.
१६) जनावरांच्या अंगावरील केस कडक, राठ तसेच उभे राहिलेत का हे पहावे.
१७) जनावर झाडावर, भिंतीवर तसेच कठीण वस्तूवर डोके घासते किंव्हा आपटतेय का ते पाहावे.
१८) जनावराचा आजार शोधण्यासाठी तसेच आजाराची तीव्रता जाणून घेण्यासाठी रक्त तपासणी करावी.
१९) रक्तातील विविध घटकांची कमतरता तसेच हिमोग्लोबीन व पेशींचे प्रमाण मोजण्यासाठी रक्त तपासणी करावी.
२०) लघवीच्या सामू वरून जनावरांमधील अँसिडिटी समजते त्यामुळे लघवीची तपासणी करावी.
२१) जनावराच्या लघवीचा रंग, पातळपणा तसेच रासायनिक गुणधर्मांचा कमी-जास्तपणा मूत्रमार्गातील रोगाचे संक्रमण, रक्तस्राव, यकृत, मुत्रपिंडातील रोग व मधुमेह, तसेच रक्तातील आजार व मूतखडे ओळखण्यासाठी लघवीची तपासणी जरूर करावी.
२२) जनावरांमध्ये कोणत्या प्रकारचा जंत प्रादुर्भाव झाला आहे ते ओळखण्यासाठी शेणाची तपासणी करावी कारण त्यावरून योग्य ती प्रतिबंधात्मक जंतनाशके देता येतात.

नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]

1 Comment
  1. NITIN RAMHARI PISAL says

    Informative and innovative article👍

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues