Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Solar Panel On Rooftop आता 25 वर्ष मोफत वापरा वीज; सरकारदेखील देतं तुम्हाला 40% अनुदान!!

0

Solar Panel On Rooftop सध्याच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. देशभरात सातत्याने डिझेल, पेट्रोल, तसंच घरगुती गॅसच्या दरात वाढ होत आहे. एवढेच नव्हेच तर कोरोनामुळे मागील दोनहुन अधिक वर्षांपासून देशातल्या सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. या स्थितीचा परिणाम रोजगार किंवा नोकऱ्यांवर झाल्याचं दिसून येतं. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मिळणाऱ्या उत्पन्नात कुटुंबाचा खर्च भागवताना सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Solar Panel On Rooftop याशिवाय, सध्याचे वीजबिल हे भरमसाठ येत असल्याने लोकांचे खिसे खाली होत असून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे वेगळेच हाल देखील होत आहेत. परंतु, आता चिंता नको. आता यापासून तुम्हाला सुटका मिळविता येणार असून सध्या भारतात मोफत वीजेवर जोरदार चर्चा सुरू आहे. हे नक्की काय आहे आणि यासाठी अर्ज कुठे करायचा आणि 25 वर्ष वीज बिलापासून सुटका कशी मिळवायची हे जाणून घेऊया..

Solar Panel On Rooftop महिन्याला हजार रुपयाचे येणाऱ्या वीजबिल भरणाऱ्याचा आकडा खूप मोठा आहे. मिळणाऱ्या उत्पन्नातून हा खर्च भागवताना सामान्य नागरिक त्रस्त होऊन जातात. या खर्चातून मुक्त होण्यासाठी तुम्ही सौर ऊर्जेचा पर्याय निश्चितच अवलंबू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवावी लागतात. यासाठी सरकारकडून देखील तुम्हाला अनुदान मिळतं किंवा तुम्ही तुमच्या खर्चानं हा पॅनेल बसवू शकता.

Solar Panel On Rooftop कशी मिळणार 25 वर्ष वीजबिलापासून सुटका?

सोलर पॅनल बसवण्यासाठी आधी तुम्हाला किती विजेची गरज आहे आणि किती मोठा सोलर पॅनल बसवावा लागेल हे शोधून काढावे लागेल. 2 किलोवॅट सौर पॅनेल बसवण्यासाठी तुम्हाला सुमारे 1.2 लाख रुपये खर्च करावे लागतील, परंतु जर तुम्ही ते तुमच्या घरी बसवले तर सरकार त्यावर 40 टक्के सबसिडी देईल. म्हणजेच 2 किलोवॅटच्या सोलर पॅनेलसाठी तुम्हाला मात्र 72 हजार रुपये खर्च करावे लागतील. आणि सौर पॅनेलचे सरासरी आयुष्य सुमारे 25 आहे, म्हणजेच एकदा पैसे खर्च करून, तुम्ही 25 वर्षांपर्यंत वीज बिलांपासून मुक्त होऊ शकता.

Solar Panel On Rooftop या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता?

▪️ सर्वप्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://solarrooftop.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

▪️ यानंतर तुम्हाला Apply for Solar Rooftop वर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, जिथे राज्यानुसार लिंक निवडा.

▪️ त्यानंतर एक फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुमचे सर्व तपशील भरा. सौर पॅनेल बसवल्यानंतर ३० दिवसांच्या आत सरकारकडून अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.

दरम्यान, केंद्र सरकारसह काही राज्यांचं सरकार यासाठी वेगळं अनुदान देतं. एकूणच विजेची मागणी आणि पुरवठ्यात तफावत आहे. त्यामुळे अपुरा वीजपुरवठा आणि भरमसाठ बिलातून मुक्ती मिळावण्यासाठी सौर ऊर्जेतून वीज निर्मिती हा पर्याय निश्चितच फायदेशीर ठरू शकतो.

हेही वाचा : पुढील महिन्यात ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या सुट्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews