Take a fresh look at your lifestyle.

पुढील महिन्यात ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या सुट्यांचे संपूर्ण वेळापत्रक

0

2022 वर्षातील नोव्हेंबर संपायला अवघे काही तास बाकी आहेत. आणि यानंतर 2022 वर्षाचा शेवटचा महिना सुरू होणार आहे. दर महिन्याप्रमाणेच पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येही अनेक दिवस बँक सुट्ट्या असतील. पुढील महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. यापैकी काही सुट्ट्यांवर संपूर्ण देशात बँका बंद राहतील, तर काही सुट्ट्या केवळ निवडक राज्यांसाठी असतील. जाणून घ्या डिसेंबर महिन्यातील सुट्यांची संपूर्ण यादी…

ही आहे बँक हॉलिडेची संपूर्ण यादी

▪️ 3 डिसेंबर (शनिवार) – सेंट झेवियर्स फेस्ट – गोव्यात बँका बंद राहणार
▪️ 4 डिसेंबर (रविवार) – रविवार असल्याकारणाने देशभरात बँका बंद राहतील
▪️ 10 डिसेंबर (शनिवार) – दुसरा शनिवार
▪️ 11 डिसेंबर (रविवार) – रविवार असल्याकारणाने देशभरात बँका बंद राहतील
▪️ 12 डिसेंबर (सोमवार) – पा-टागन नेंगमिंजा संगम – फक्त मेघालयात बँका बंद राहतील
▪️ 18 डिसेंबर (रविवार) – रविवार असल्याकारणाने देशभरात बँका बंद राहतील
▪️ 19 डिसेंबर (सोमवार) – गोवा मुक्ती दिन – फक्त गोव्यात बँका बंद राहतील
▪️ 24 डिसेंबर (शनिवार) – ख्रिसमससह चौथा शनिवार – देशभरातील बँका बंद राहतील
▪️ 25 डिसेंबर (रविवार) – रविवार असल्याकारणाने देशभरात बँका बंद राहतील
▪️ 26 डिसेंबर (सोमवार) – ख्रिसमस, लासुंग, नामसंग – मिझोराम, सिक्कीम आणि मेघालयमध्ये या दिवशी बँका बंद राहतील
▪️ 29 डिसेंबर (गुरुवार) – गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिवस – या दिवशी चंदीगडमध्ये बँका बंद राहतील.
▪️ 30 डिसेंबर (शुक्रवार) – यू कियांग नांगवाह – बँका फक्त मेघालयातच बंद राहतील
▪️ 31 डिसेंबर (शनिवार) – चौथा शनिवार आणि थर्टी फस्ट

दरम्यान, आपली सर्व बँकांशी निगडित महत्वाची कामं लवकरात लवकर घ्या उरकून.. अन्यथा तुमचा डिसेंबर महिन्यात खोळंबा होऊ शकतो

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues