Take a fresh look at your lifestyle.

पिकांना स्लरी कशी द्यावी? फायदे काय? महत्व काय? जाणून घ्या!

0

पिकाला स्लरी देणारी पद्धत जरी नवीन असली तरी पिकासाठी ती अत्यंत फायदेशीर ठरत आहे. मात्र ती दुकानात मिळत नसल्याने त्याचा फारसा वावर होत नाही. स्लरी स्वतः घरी बनवावी लागते. स्लरी शेतात वापरल्याने जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू अ‍ॅक्टिव्ह होतात. यातून त्यांना ऊर्जा मिळते व त्या जिवाणूंमुळे जमिनीमधील अन्नद्रव्य पिकास उपलब्ध देखील होतात. जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म वाढवते. जमिनीची पोकळी वाढवते व हवा खेळती ठेवली जाते. जमिनीचा कर्ब:नत्र गुणोत्तर टिकून राहते.

पिकांच्या योग्य वाढीसाठी स्लरी कशी बनवावी? :
● आपल्या जनावरांच्या गोठ्यात मलमूत्र साठवण्याची सोया असू द्या.
● जनावरांचे ताजे शेण उन्हात न ठेवता सावलीत ठेवा.
● सिमेंटची 300 ते 400 लिटर ची टाकी असू द्या.
● 20 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 200 ते 250 लिटर पाणी सिमेंटच्या टाकीत टाकून चांगले हलून घ्या.

स्लरीचे मुख्य प्रकार :

  • मुख्य अन्नद्रवयाची स्लरी
  • सूक्ष्म अन्नद्रवयाची स्लरी
  • जिवाणूंची स्लरी
  • कडधान्य स्लरी
  1. मुख्य अन्नद्रव्याची स्लरी : हे रासायनिक खते पिकास लवकर लागू होतात, याने कार्यक्षमता वाढते, पांढऱ्या मुळींची वाढ होते. मुख्य अन्नद्रव्यातील स्फुरदचे स्थिरीकरण कमी होण्यास मदत होते. तसेच नत्राचे बाष्पीभवन होत नाही.

स्लरी कशी बनवावी? : साधारण 300 ते 350 फळ झाडांसाठी ताजे शेण 20 Kg, जनावरांचे मूत्र 10 Lit, निंबोळी पेंड 15 Kg, युरिया 5 Kg, सिंगल सुपर फॉस्फेट 10 Kg, पोटॅश 5 Kg आणि 200 ते 250 Lit पाणी या पद्धतीने मुख्य अन्नद्रव्याची स्लरी बनवा. महिन्यातून किमान एकदा तरी प्रति झाड 1 Lit या प्रमाणात वापरा.

तुमचा युरिया भेसळयुक्त नाही ना ? | युरियातील भेसळ ओळखा फक्त 2 मिनीटात | घरगुती जुगाड
  1. सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य स्लरी : झिंक व फेरस हे जमिनीमध्ये दिले तर ते पिकाला पूर्णतः न लागता जमिनीत दुसऱ्या फॉर्ममध्ये स्थिर होते. म्हणून शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीतून देत असताना स्लरीच्या स्वरूपात द्या. यासाठी ताजे शेण 20 Kg, जनावरांचे मूत्र 10 Lit, निंबोळी पेंड 15 Kg, झिंक सुल्फेट 5 Kg, फेरस सुल्फेट 3 Kg, म्यॅग्नीस 2 Kg, कॉपर सुल्फेट 100 Gm व बोरॉन 30 Gm.

तसेच दुय्यम अन्नद्रव्य स्लरी बनवताना ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, निंबोळी पेंड 15 kg, कॅल्सीम 15 kg, म्यॅगनेशिअम 15 kg, गंधक 10 kg, 200 ते 250 पाणी द्या. स्लरी दिवसातून दोन वेळेस चांगले हलवा. सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य स्लरी मध्ये 10 ते 12 दिवसांचे आंतर ठेवा.

  1. जिवाणू स्लरी

जिवाणू स्लरीचे फायदे

● नत्र युक्त जिवाणू स्लरीमुळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध होते.
● सेंद्रिय पदार्थाचे जलद पद्धतीने विघटन होते.
● बियाणांच्या उगवण क्षमतेत वाढ होते.
● पिकांची चांगली वाढ व रोगप्रतिकर शक्तीत वाढते.
● तुमच्या जमिनीचा पोत सुधारतो.
● रासायनिक खतावरील खर्चात मोठी कपात होते.
● जमिनीवर व पिकावर जास्त मात्रेने देखील दुष्परिणाम होत नाही.

जिवाणू स्लरी कशी बनवावी? : ताजे शेण 20 Kg, जनावरांचे मूत्र 10 Lit, काळा गूळ 2 Kg, ऍझोटोबॅक्टर 500 Gm, फॉस्फेट सोलुब्लिसिन्ग मायक्रो ऑर्गॅनिसम 500 Gm, पोटॅश मोबिलिझर 500 Gm, इ एम द्रावण 1 Lit व इतर जैविक बुरशीनाशके 1 Kg, 200 ते 250 Lit पाणी. जैविक खते व बुरशीनाशके एकत्र वापरू नका.

  1. कडधान्य स्लरी :
    एक एकरसाठी कडधान्य स्लरी : ताजे शेण 20 Kg, जनावरांचे मूत्र 10 Lit, हुमिक अ‍ॅसिड व व्हर्मीवॉश 2 Lit, भरडा कडधान्य प्रत्येकी 1 Kg मूग, मठ, चवळी, हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद, इ. एम द्रावण 2 Lit व 200 ते 250 Lit पाणी.

टीप : वरील सर्व स्लरी द्रावण 5 ते 6 दिवस ठेवा. दररोज सकाळी 2 मिनिट हलवा. सातव्या दिवशी वापशावर जमिनीतून पिकाला आळवणी (ड्रेंचिंग) करा. (हि स्लरी एक एकर क्षेत्रासाठी वापरा.)

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues