Take a fresh look at your lifestyle.

पशुपालकांनों!! अशी घ्या…गाभण गाईंची काळजी…

0

गर्भाशयाचे आरोग्य, वासरांची गर्भाशयातील वाढ, तंदुरुस्त वासरांचा जन्म व दुध उत्पादन हे गाभण काळात केलेल्या चांगल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. चला तर मग जाणुन घेऊया ! गाभण काळातील गाईंची काळजी कशी घ्यावी.

१) दुभती गाय माजावर आल्यानंतर चांगल्या दर्जाचे सिमेन भरून कृत्रिम रेतन करावे व त्यांची नोंद नोंदवहीत किंवा ॲप्लिकेशन मध्ये करावी.
२) गाय गाभण असल्यास रेतनाच्या तारखेवरून ती साधारणपणे कधी विणार याचा अंदाज लावता येतो
३) कृत्रिम रेतन केल्यानंतर गाय २१ दिवसांनी  माजावर येते की नाही ते तपासावे. 
४) गाय पुन्हा माजावर आली तर रेतन करून घ्यावे किंवा माज केला नाही तर गाभण आहे असे गृहीत धरावे. 
५) गाभण गाईची २.५ ते ३.० महिन्यांनंतर पशुवैद्याकडून गाई गाभण असल्याची खात्री करावी.
६) पाहिले सहा महिने वासराची वाढ हळूहळू होते या काळात गाय दूधही देतात त्यामुळे गाईंना अधिक समतोल आहार देणे गरजेचे असते त्यांचा उपयोग गर्भ वाढीसाठी होतो.
७) गाभण काळातील ७ व्या महिन्यापासून गर्भातील वासराची वाढ दुप्पट होते त्यामुळे या काळात गाईंची ची विशेष काळजी घ्यावी लागते.
८) उंचावर किंवा डोंगराळ भागात गाई चरायला नेऊ नये कारण गाय चालताना पडल्यास गर्भाशयाला पीळ पडून
उपचार अभावी वासरू दगावू शकते.
९) गाईला मारणे, पळवणे व इतर जनावरांत सोडणे टाळावे कारण गाभण गाईला दुखापत होऊन गर्भपात होण्याची दाट शक्यता वाढते.
१०) आठव्या महिन्यात गाईला आटवावे व एक ते दीड किलो अतिरिक्त पशुआहार द्यावा.

लाळ्या खुरकत बद्दल जाणून घ्या, (पायखुरी, तोंडखुरी, FMD) | कृषिदूत 


११) जनावरांच्या शरीरात खनिज मिश्रणांची वेळेवर  पूर्तता न झाल्यास गाभण जनावरे अशक्त होतात,वासरू कमी वजनाचे जन्माला येऊन, गाईंचा वार वेळेवर पडत नाही याचा एकूणच परिणाम आपल्या दुग्धव्यवसायाच्या अर्थशास्त्रावर होतो.
१२) गाभण गाईला दररोजच्या आहारातून आवश्यक प्रथिने,ऊर्जा, क्षार,जीवनसत्त्वे आणि स्वच्छ पाणी देणे आवश्यक असते.
१३) गाभण गाईला सकस ओला व वाळला चारा, मुरघास व गाईच्या शरीर पोषणासाठी एक ते दोन किलो अधिक पशुखाद्य तसेच ४०-५० ग्रॅम मिनरल मिक्चर दयावे.
१४) गाईंचे दुध बंद झाल्यापासून ते परत दुध चालू होईपर्यंत या काळाला भाकड काळ म्हणतात.हा काळ ६० ते ८४ दिवसांचा असतो.
१५) गाभण काळात गाईला दररोज थोडा वेळ चालण्याचा व्यायाम द्यावा त्यामुळे त्यांचे स्नायू तसेच पचनेंद्रिये उत्तम राहतात.
१६) गाभण काळात कधी कधी गाईच्या सडातून चिक बाहेर येतो तो पिळून काडून कासेवरचा दाब कमी करावा.
१७) गाभण काळाच्या शेवटच्या आठवड्यात गाईला इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे. 
१८) शेवटच्या दिवसात गाईकडे विशेष लक्ष द्यावे. 
१९) विण्या अगोदर एक आठवडा किंवा व्यायल्यानंतर लगेच मिल्क फिवर होऊ नये यासाठी पशुतज्ज्ञांकडून कॅल्शियमचे इंजेक्शन टोचुन घ्यावे.
२०) गाईच्या विण्याचा काळ हा २ ते ३ तासांचा असतो. जर पहिले वेत असेल तर हा काळ ४ ते ५ तास असू शकतो हे जनावरांच्या प्रकृती वर अवलंबून असते.

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

राहुल द.गलांडे, नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/डेअरी प्रशिक्षक 
धेनू टेक सोलुशन्स प्रा.लि.भोसरी, पुणे
ई मेल- [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues