Take a fresh look at your lifestyle.

…तर असे असतात पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत!

0
  1. चातक पक्षी : आफ्रिकेतून आलेले हे पक्षी पावसाळा जवळ आल्याचे संकेत सर्वात अगोदर सर्वप्रथ देतात. पाऊस वेळेवर येणार असल्यास चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर आगमन लांबले तर पाऊसही लांबणार असे बोलले जाते. हा पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडला की, पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले असे समजावे.
  2. पावशा पक्षी : सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणारा हा एक महत्त्वाचा पक्षी आहे. पावशा ओरडू लागला की, जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू केली जात.
  3. तित्तीर पक्षी : हा पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा स्वरात ओरडू लागले की, लवकरच पाऊस येणार असे समजावे. मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की, पावसाचे लक्षण समजले जाते.
  4. कावळा : जर कावळ्याने मे महिन्यादरम्यान बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज वृक्षांवर केले तर पाऊस चांगला येतो, असे मानले जाते. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार आणि पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची नांदीच. जुन्या काळात कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही पावसाचा अंदाज बांधला जात. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो आणि दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेच म्हणून समजा.
बांधावर झाडे असावी का नसावी ? | बांधावर झाडे लावण्याचे फायदे | Krushidoot
  1. वादळी पक्षी : हे पक्षी पाऊस येण्याअगोदर किनाऱ्याच्या दिशेने येत असतात. याचा अंदाज ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. एक प्रकारे हे पक्षी धोक्याची पूर्वसूचना देत असतात. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार असा होतो.
  2. मासे : पहाडी, डोंगरी भागात असणाऱ्या माशांच्या अंड्यातील पिल्ले जेव्हा मोठी होऊन समुद्राच्या दिशेने पोहू लागतात. तो काळ पाऊस संपण्याचा तसेच उत्तरा नक्षत्राचा असतो. यावरून पाऊस केव्हा पडणार? केव्हा संपणार? याची स्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळत असते.
  3. खेकडे : शेतकऱ्याला समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकड्यांवरून पावसाचे संकेत मिळत असतात. हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा काळ असतो. यादरम्यान भरधाव वाहनांखाली हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जात असतात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते? याचा कोणी विचारच करत नाही.
  4. हरीण : जर पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत.
  5. वाघीण : वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावेल असेच असते. यंदा पाऊस नाही, त्यामुळे जंगलात गवत नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल याची पूर्वकल्पना आल्यानेच वाघीण गर्भपात करवून घेतात. या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आहे.
  6. वाळवी : जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.
  7. काळ्या मुंग्या : जेव्हा काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेत असतील नेऊ तर पाऊस नक्की पडणार, असे समजा. जर बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले तर हमखास पावसाची चाहूल समजा. कारण या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues