Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan Sanman Yojana पती-पत्नी दोघांनाही PM Kisan योजनेचा लाभ मिळणार? वाचा सविस्तर

0

PM Kisan Sanman Yojana सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan) सुरु केली आहे. पण या योजनेचा लाभ पती आणि पत्नी दोघांनाही मिळू शकतो का हा महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबद्दल अनेकदा दिशाभूल करणारी उत्तरेही दिली जातात. पण खरं म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ पती-पत्नी दोघांना एकदम मिळू शकत नाही. याचाच अर्थ पती आणि पत्नी दोघांच्या नावावर स्वतंत्रपणे 2-2 हजारांचा हप्ता जमा होत नाही.

PM Kisan Sanman Yojana पीएम किसान सन्मान योजनेचे अनेक लाभार्थी आपल्या स्वत:च्या आणि पत्नीच्या नावावर असे वेगवेगळे पैसे घेऊन सरकारची दिशाभूल (Fraud) करत आहेत. म्हणजेच एकाच घरात 4 हजार रुपये जमा होत आहेत. सरकारची दिशाभूल करणाऱ्या अशा शेतकऱ्यांवर सरकारने कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा शेतकऱ्यांना सरकारने नोटिसाही पाठवल्या आहेत.

PM Kisan Sanman Yojana अपात्र शेतकऱ्यांकडून होणार वसुली (Who Are Not Eligible?) ज्या शेतकऱ्यांनी बनावट पद्धतीने खोटी कागदपत्रं देऊन किसान सन्मान योजनेचे पैसे घेतले आहेत, त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेले हप्ते वसूल केले जाणार आहेत, असे स्पष्ट आदेश सरकारने दिले आहेत. पती आणि पत्नी अशा दोघांच्या नावावर ज्यांनी पैसे घेतले आहेत त्यांच्याकडूनही ते पैसे वसूल केले जाणार आहेत. सरकारच्या नियमांनुसार जे योजनेसाठी पात्र नाहीत त्यांच्याकडूनही आतापर्यंत दिले गेलेले हप्ते परत घेतले जातील. पीएम किसान सन्मान योजना नेमकी काय आहे?

PM Kisan Sanman Yojana : पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात. अर्थात ही रक्कम मिळण्यासाठी सरकारने काही निकष घालून दिले आहेत. एका ठराविक उत्पन्नाच्या मर्यादेखाली असणारे शेतकरीच यासाठी अर्ज करू शकतात. त्याशिवाय या योजनेसाठी पात्र ठरवण्यासाठीचे अनेक अन्यही निकष आहेत. या योजनेचा 11 वा हप्ता 31 मे 22 रोजी 10 कोटींपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये या योजनेची सुरुवात उत्तर प्रदेशमधून केली होती.

PM Kisan Sanman Yojana पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अपात्रतेचे निकष :

▪️ संस्थाच्या मालकांच्या जमिनी (Institutional Landlords), ज्या शेतकऱ्यांकडे सरकारी शेत, कोणत्याही ट्रस्टची शेती किंवा सहकारी शेती असेल ते या योजनेसाठी अपात्र ठरतात.
▪️ ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांमधील कोणत्याही व्यक्तीकडे पूर्वी किंवा सध्या एखादं घटनात्मक पद असेल, अशा व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत.
▪️ आमदार व खासदारही या योजनेच्या कक्षेत येत नाहीत. राज्यातील विधान परिषदांच्या सदस्यांची कुटुंबं, शहर प्राधिकरणाचे माजी आणि वर्तमान महापौर आणि जिल्हा पंचायतींचे माजी आणि सध्याचे अध्यक्ष या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत.
▪️ माजी आणि सध्याचे केंद्र किंवा राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी व कर्मचारी या योजनेत अर्ज करू शकत नाहीत.
▪️ केंद्र किंवा राज्याच्या सार्वजनिक योजना आणि संबंधित कार्यालयांच्या किंवा केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या स्वायत्त संस्थांचे विद्यमान किंवा माजी अधिकारी यासाठी अपात्र आहेत.
▪️ स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित कर्मचारी. अर्थात मल्टी टास्किंग स्टाफ, चतुर्थ श्रेणी किंवा ड वर्गातील कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत.
▪️ ज्यांना दरमहा 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन मिळते असे पेन्शनधारक पात्र नाहीत.
▪️ गेल्या वर्षी ज्यांनी आयकर भरला आहे ते या योजनेत अर्ज करू शकत नाहीत.
▪️ त्याचप्रमाणे इंजिनीअर, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटट आणि आर्किटेक्ट व अन्य व्यावसायिक संस्थांशी जोडल्या गेलेल्या नोंदणीकृत व्यक्तीही या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत.
PM Kisan Sanman Yojana खोटी कागदपत्रं देऊन सरकारला फसवणाऱ्या आणि गरिबांसाठी असलेल्या सरकारी योजनेचा फायदा घेणाऱ्यांवर सरकारने आता कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues