Take a fresh look at your lifestyle.

Krushi Vibhag Maharashtra कृषी विभागाचे आवाहन; खरीप पीक विमा योजनेत ३१ जुलैपर्यंत सहभागी व्हा

0

Krushi Vibhag Maharashtra खरीप हंगाम २०२२-२३ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PM Fasal Bima Yojana ) शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी असून, योजना ऐच्छिक आहे, अधिसूचित पिकांसाठी खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिम स्तर निश्चित करण्यात आला आहे. विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी (Kharif Season) खरीप हंगामासाठी विमा हप्ता २%, रब्बी हंगामासाठी १.५% व नगदी पिकांसाठी ५% असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

Krushi Vibhag Maharashtra ई-पीक पाहणी E – pik Pahaniअंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदविण्यात आलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद॒भवल्यास ई-पीक पाहणीमधील पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे.

Krushi Vibhag Maharashtra अधिक माहितीसाठी :
आय.सी.आय.सी.आय जनरल लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी, पुणे टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२, ई-मेल आयडी [email protected] वर ई-मेल करावे.

Krushi Vibhag Maharashtra या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.