Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा

0

PM Kisan Yojana पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या बाबतीत एक महत्वाची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 11 हप्ते आतापर्यंत हस्तांतरित केले आहेत, तर 12 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. पण आता खात्यात 12 वा हप्ता कधी येणार याची माहिती समोर येत आहे.

PM Kisan Yojana पीएम मोदींच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यात 31 मे रोजी 11व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले होते. त्यानंतर केवायसी करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते.

PM Kisan Yojana सरकार शेतकऱ्यांना ही रक्कम प्रत्येकी दोन हजाराच्या तीन हप्त्यांमध्ये देते. पहिला हप्ता दरवर्षी 1 एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत पाठविला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मे रोजी पहिला हप्ता (11 वा हप्ता) आला आहे. यापूर्वी 1 जानेवारी 2022 रोजी मागील वर्षाचा शेवटचा हप्ता खात्यावर पाठविण्यात आला होता.

मुलींच्या सुरक्षित आर्थिक भवितव्यासाठी ही योजना खूपच लाभदायी! दररोज 416 रुपये जमा केल्यास मिळेल 65 लाख रुपयांचा निधी

Loan For Land : जमीन घेण्यासाठी कर्ज घेताय ? तर या महत्वाची माहिती नक्की वाचा

PM Kisan Yojana आता शेतकरी बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान हस्तांतरित होणे अपेक्षित आहे. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून 1 सप्टेंबर रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 वा हप्ता जमा करणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत वाढवली आहे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.