Take a fresh look at your lifestyle.

Parenting Tips : लहान मुलांच्या कुशाग्र बुद्धिसाठी ‘हे’ करा…

0

Parenting Tips : आपले मूल सर्व क्षेत्रात उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हावे असे स्वप्न सर्वच आई-वडील पहात असतात. यासाठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही. बौध्दिक विकासासाठी किंवा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आईवडील अनेक प्रयत्न करताना दिसून येतात. अनेकांचे प्रयत्न यशस्वीही होतात तर काहींना अपयश येते. मात्र लहान मुलांच्या सर्वांगिण वाढीसाठी संतुलित आहारासोबतच अन्य काही गोष्टी महत्वाच्या आहेत. नेमक्या कोणत्या आहेत या गोष्टी त्याबद्दल जाणून घेऊयात…

Parenting Tips लहान मुलांच्या कुशाग्र बुद्धीसाठी नैसर्गिकरित्या साखरेचा पुरवठा करणार्‍या मध, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ तसेच सीफूड्सचा आहारात वापर अत्यावश्यक आहे.
Parenting Tips शारिरीक स्वास्थ्य सुधारण्यासोबतच बौद्धिक विकासासाठीदेखील ‘योगा’ फायदेशीर आहे. सर्वांगासन, पश्चिमोतासन, भुजंग़ासन यामुळे चेतासंस्थेला चालना मिळते तसेच स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
Parenting Tips रात्रीच्या वेळेस मुलांसाठी गोष्टी वाचून सांगणे हे त्यांना झोपवण्यासाठी जितके फायदेशीर ठरते तेवढेच त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यासही फायदेशीर ठरते. यामुळे भाषेचे ज्ञान, चौकस विचार करण्याची क्षमतादेखील सुधारते.
Parenting Tips आजकाल मुलं व्हिडीयो गेम्स किंवा व्हिडीयो गेम वर अधिक अ‍ॅडिक्ट होतात. अशावेळी त्यांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी काही मजेशीर मेमरी गेम्स खेळण्याची सवय लावा. अशा खेळांमध्ये गुंतून राहिल्यास स्मरणशक्तीला चालना मिळण्यास मदत होते.
मुलांना केवळ पुस्तकी किडा बनवू नका. त्यांच्या विकासासाठी मैदानी खेळ खेळणेदेखील आवश्यक आहे. अशा खेळांमध्ये शारिरीक उर्जा अधिक लागते. तसेच यामुळे व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी मदत होते. परिणामी सर्वांगिण विकास होण्यास मदत होते.
बायोलॉजिकल सायकायट्रीच्या अहवालानुसार, ताण मुलांचा विकास खुंटवू शकतो. त्यामुळे मुलांपासून कौटुंबिक वाद, मानसिक ताणापासून दूर ठेवा.

Sleeping Tips : लवकर झोप येत नाहीये तर हे 4 प्रेशर पॉइंट दाबा, काही मिनिटांत झोप येईल

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues