Take a fresh look at your lifestyle.

अरे हि गाडी आहे का सरडा? एका क्षणात बदलते आपला रंग..!!

0

ऑटोमोबाईल क्षेत्रात गेल्या काही वर्षात झपाट्याने बदल होत आहेत. एकापेक्षा एक सरस गाड्या बाजारात दाखल होत आहेत. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सातत्याने होणारे नवनवीन बदल हे बदल ग्राहकांच्या फायद्याचे असतात. तर काही बदल हे केवळ कारची शोभा वाढवण्याचं काम करतात. बीएमडब्ल्यू कंपनीने आता अशीच एक कार आणली आहे, जी कारमधलं एक बटण दाबल्यावर तिचा रंग बदलू शकते. सध्या ही गाडी तीन रंग बदलू शकते. हि कार कोणती आहे काय आहे हिची खासियत जाणून घेऊया सविस्तर..

मिळालेल्या माहितीनुसार.., जर्मन कंपनी बीएमडब्ल्यूने आपली लक्झरी कार BMW IX लॉन्च केली असून हि कार अवघ्या काही क्षणात आपला रंग बदलते. बीएमडब्लू या कारसाठी ई-इंक नावाच्या कंपनीसोबत काम करत असून ही कंपनी 1997 पासून वाहनांच्या अँप्लिकेशनसाठी काम करते. कंपनीने सोशल मीडियावर या कारबद्दल काही माहिती शेअर केली असून कंपनीने ट्विट करून माहिती दिली आहे की, एक बटण टच करून तुम्ही कारचा रंग बदलू शकता. ई इंकयुक्त बीएमडब्ल्यू आयएक्स फ्लो एका क्षणात स्वतःचा रंग बदलू शकते.

किती रंग बदलू शकते ही कार?
या कारबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आलेल्या माहितीनुसार, ही कार पांढरा, काळा आणि राखाडी अशा रंगांमध्ये बदलली जाऊ शकते.

कशी रंग बदलते ही कार?
बीएमडब्ल्यूने या कारची रंग बदलण्याची प्रक्रिया देखील उघड केली आहे. ही इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे नियंत्रित प्रक्रिया असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे इलेक्ट्रोफोरेटिक तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. यासाठी वेगळ्या पॉवरची आवश्यकता नाही. याच्या बॅकग्राऊंडमध्ये विविध रंगद्रव्ये देण्यात आली आहेत. ज्यामुळे संपूर्ण वाहनाचा रंग बदलता येतो. कंपनीचे ग्रुप डिझाईन चीफ एड्रियन व्हॅन यांनी सांगितले की, हा BMW ix Flow हा एक अँडव्हान्स संशोधन प्रकल्प आहे.

Home Sales : महागड्या गृहकर्जानंतरही 2022 मध्ये घरांची विक्री आठ वर्षांच्या उच्चांकावर, 3.65 लाख घरांची विक्रमी विक्री

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues