Take a fresh look at your lifestyle.

National Parties In India : राष्ट्रीय पक्ष म्हणजे नेमके काय? एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून कसा ठरवला जातो?

0

National Parties In India गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप व काँग्रेसनंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. दिल्ली आणि पंजाबामधील सत्ता स्थापन केल्यानंतर आम आदमी पक्षाने गुजरातमध्येही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. या प्रमाणे गुजरातमध्ये पहिल्यादांच आम आदमी पार्टी निवडणूक लढली.

जवळपास 10 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाला (AAP) आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे.. राष्ट्रीय पक्ष दर्जा निकष काय? एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून कसा ठरवला जातो? जाणून घ्या याबाबत थोडक्यात..

National Parties In India राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचे निकष काय?

एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या तीन महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागते, तेव्हाच त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला जातो.

▪️ लोकसभेतील किमान 2 टक्के जागा पक्षानं तीन वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात.
▪️ लोकसभेत 4 खासदार असावेत. शिवाय, 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मतं मिळेलेली असावीत.
▪️ किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा.

तर निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार सलग दोन निवडणुकांनंतर जर एखादा राजकीय पक्ष वरील अटींची पूर्तता करण्यात अपयशी ठरत असेल तर त्याची राष्ट्रीय पक्षाची मान्यता काढून घेण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले.

राष्ट्रीय पक्ष झाल्यास काय काय फायदे मिळतात?
▪️ राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर त्या-त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह हे संपूर्ण देशभरात कायम राहते. या निवडणूक चिन्हावर इतर कोणताही पक्ष किंवा व्यक्ती दावा करू शकत नाही.
▪️ राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर तो पक्ष निवडणूक प्रचारात अधिकाधिक 40 स्टार प्रचारक नेमू शकतो. तर या प्रचारकांचा खर्च उमेदवारांसाठीच्या खर्चातून न होता, पक्षाच्या खात्यातून केला जातो.
▪️ सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यकाळात दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर पक्षाच्या प्रचारासाठी वेळ मिळणार.
▪️ राष्ट्रीय पक्ष घोषित झाल्यावर पक्षाचे मुख्यालय बांधण्यासाठी सवलतीच्या दरात सरकारी जमीन मिळते.
▪️ मान्यताप्राप्त राज्य किंवा राष्ट्रीय पक्षाकडून नामांकन दाखल करण्यासाठी फक्त एकाच प्रस्तावकाची आवश्यकता असते.

हेही वाचा : दिल्लीत ‘आप’च बाप, भाजप आणि काँग्रेस साफ; जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी!

गुजरातमध्ये भाजपच्या विजयाचा मोदी मंत्र काय होता? सविस्तर वाचा!

सध्याच्या घडीला कोण कोणते राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखले जातात :

देशात सध्या 8 राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असून यामध्ये भाजप (BJP), काँग्रेस (INC), बहुजन समाज पक्ष (BSP), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI-M), तृणमूल काँग्रेस (TMC), नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues