Take a fresh look at your lifestyle.

Rabi Season : बियाणे खरेदी करताना ही घ्या काळजी, अन्यथा तेलही गेले अन्….

0

Rabi Season सुरु होत असून पावसाचे आगमन लवकरच होणार आहे. अशावेळी शेतकरी बी-बियाणे खरेदीवर तुटून पडतात. पण बाजारात विविध कंपन्यांचे बियाणे विक्रीस उपलब्ध असल्याने व थेट शेतातही बियाणे विक्रीस येत असल्याने बियाणे खरेदी करताना शेतक-यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे बियाणे खरेदी करताना काय खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. त्याविषयी जाणून घेऊयात…

Rabi Season बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी :
▪️ बियाणे हे जवळच्या कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावे.
▪️ बियाण्याच्या पिशवीला लेबल आहे की नाही याची खात्री करावी.
▪️ बियाणे खरेदीच्या पावतीवर बियाण्याची जात, उत्पादनाचे नाव, किंमत लिहिल्याची खात्री करून घ्यावी.
▪️ बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या पिशवीवर किंवा पाकिटावर लेबल क्रमांक, टॅग, बियाण्याचे गुणधर्म, बियाण्याची अंतिम मुदत संपण्याची तारीख पाहूनच बियाणे खरेदी करावे.
▪️ पेरणी करते वेळी बियाण्याची पिशवी नेहमी उलटी फोडावी, लेबलवरून फोडू नये.
▪️ बियाण्याच्या पिशवीवरील लेबल, टॅगसह, बियाण्याचा थोडा भाग नमुना म्हणून जपून ठेवावा.
▪️ बियाणे खरेदीची पावती व बियाण्याची पिशवी जपून ठेवावी.
▪️ शक्यतो बियाणे कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा.

हेही वाचा : सर्व काही बदलतंय परंतु शेतकऱ्यांचे नशीब नाही! मागील पाच महिन्यात राज्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांची आत्महत्या

Rabi Season या गोष्टी टाळा :
▪️ फेरीवाले विक्रेते (घरपोहच सेवा देणारे) यांच्याकडून बी – बियाणे, खत व औषधे यांची खरेदी करू नये.
▪️ फेरीवाल्यांकडील उत्पादने सरकारमान्य नसून बोगस असतात. यामुळे उत्पादन वाढत नाही.
▪️ फेरीवाल्यांकडील खरेदीची पावती भविष्यात होणाऱ्या नुकसानास उपयोगी नाही.
▪️ काही वेळा उत्पादक कंपनीचं अस्तित्वात नसते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues