Take a fresh look at your lifestyle.

Gold From ATM आता चक्क ATM मधून काढता येणार सोने, कार्ड टाकताच मिळणार गोल्ड

0

Gold From ATM आपल्या पैकी सर्वांना माहिती आहे की..,एटीएम म्हणजे एनी टाईम मनी. ATM हे सर्वसामान्यांच्या दररोजच्या जीवनाशी निगडित असलेलं एक समीकरण बनले आहे. आजवर तुम्ही पैसे काढण्यासाठी अनेकदा केला असेल. पण तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही ATM मधून पैशा सोबत सोने देखील काढू शकता. देशात पहिल्यांदाच ATM मधून सोनं येणार अशी एक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. हे वाचून तुमचंही डोकं चक्रावलं ना, पण होय असं खरंच घडलं आहे.

Gold From ATM आजवर तुम्ही ऑटोमेटेड ट्रेलर मशीन म्हणजेच एटीएम मधून कॅश काढली असेल. काही ठिकाणी वॉटर एटीएमही पहिले असेल. पण आता तुम्ही रोख रकमेऐवजी थेट एटीएममधून सोन्याची नाणी काढू शकता. वास्तविक पाहता, जगातील पहिले रिअल टाईम गोल्ड एटीएम तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये बसवण्यात आले आहे. या एटीएममधून चक्क तुम्हाला सोन्याची नाणी काढता येणार आहे. सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गोल्डसिक्का या कंपनीने हे एटीएम बसवले आहे. या एटीएममधून तुम्ही एकवेळी 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंतची नाणी काढता येणार असल्याचे कंपनीचे म्हंटले आहे.

हेही वाचा :

दिल्लीत ‘आप’च बाप, भाजप आणि काँग्रेस साफ; जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी!

गुजरातमध्ये भाजपच्या विजयाचा मोदी मंत्र काय होता? सविस्तर वाचा!

Gold From ATM एटीएमद्वारे सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा उपयोग करता येणार आहे. एवढेच नव्हे तर या एटीएममध्ये सोन्याचे दर हे लाईव्ह अपडेट होत राहतील. तर गोल्ड एटीएमची सेवा 24 तास उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Gold From ATM दरम्यान, गोल्डसिक्काचे सीईओ सी. तरुज यांच्या मते पुढील काही दिवसात पेड्डापल्ली, वारंगल आणि करीमनगरमध्ये सोन्याचे एटीएम चालू करण्याचा कंपनीचा विचार असून येत्या दोन वर्षांत संपूर्ण भारतात सुमारे तीन हजार सोन्याचे एटीएम सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues