Take a fresh look at your lifestyle.

MSCB strike update : एकीकडे महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, तर दुसरीकडे MSCB संचालकांनी केले मोठे वक्तव्य..

0

वीज वितरणाच्या खासगीकरणाला विरोध यासह अदानी वीज कंपनीला वितरणाचा परवाना देऊ नये आदी मागण्यांसाठी 4 जानेवारीपासून (मंगळवारी रात्री 12 वाजेपासून) राज्यातील 80 हजारहुन अधिक वीज कामगार, अभियंते, अधिकारी व 40 हजारहुन अधिक कंत्राटी कामगार, तसचे सुरक्षा रक्षकांनी राज्यभरात विविध ठिकाणी 72 तासांचा संप पुकारला आहे. परिणामी, राज्यभरातील वीज यंत्रणा कोलमडून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच या संपामुळे पुढचे तीन दिवस राज्यातील वीजपुरवठा खंडीत राहिल, अशा प्रकराचा मेसेजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे (MSEB) संचालक विश्वास पाठक यांनी ट्विट करत जनतेला एक आव्हान केले आहे

MSEB संचालक विश्वास पाठक म्हणाले..

“राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही. वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित राहील याची खात्री बाळगावी.”

राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही.

वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे.

अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित राहील याची खात्री बाळगावी.— Vishwas Pathak (@vishwasvpathak) January 3, 2023

दरम्यान, महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. 1800-212-3435 किंवा 1800-233-1912, 1800-233-3435 यावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues