Take a fresh look at your lifestyle.

Mahavitaran Strike : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप; ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित

0

Mahavitaran Strike वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वीजकर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने संपाचे हत्यार उपसले असून बुधवारपासून सर्व अधिकारी-कर्मचारीसंपात सहभागी होत आहेत. तीन दिवसांच्या या संपादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास नागरिकांना अंधारात राहण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे खासगी एजन्सीची मदत घेण्याची तयारी वीज वितरणने चालविली आहे.

Mahavitaran Strike वीज कर्मचारी संपावर गेल्याचा फटका राज्यातल्या ग्रामीण भागातही बसत आहे. साताऱ्याच्या ग्रामीण भागातही बत्ती गुल झाली आहे. आधीच ग्रामीण भागात लोडशेडिंगचं संकट असतं. त्यात आता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारीच उपलब्ध नाहीत.

Mahavitaran Strike तसंच वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो पुर्ववत करणार नसल्याचं पत्रकही संपकरी वीज कर्मचाऱ्यांना काढलंय. तेव्हा ग्रामीण भागातला वीजपुरवठा कधी पुर्ववत होणार हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

Mahavitaran Strike महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 1 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. महावितरण संपकरी संघटना कर्मचारी तसच महावितरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

महतवाच्या बातम्या :
Electricity Inflation : नव्या वर्षात सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता, लवकरच वीजदरवाढ होणार!!

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues