Take a fresh look at your lifestyle.

most google searched indian actress 2022 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली अभिनेत्री कोण? नाव जाणून धक्का बसेल!

0

most google searched indian actress 2022 सन 2022 मध्ये आतापर्यंत आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद चर्चेत राहिल्या. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रसिद्धीच्या झोतात असूनही या सेलिब्रिटींची नावे सर्वाधिक सर्च केलेल्या लोकांच्या यादीत समाविष्ट नाहीत. तर, या वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली अभिनेत्री आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोण नसून सुष्मिता सेन Sushmita Sen आहे.

most google searched indian actress 2022 दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट या वर्षभर ज्या प्रकारे चर्चेत राहिल्या, त्यावरून या दोन अभिनेत्रींची नावे या यादीत नक्कीच सामील होतील असे वाटत होते. पण या दोन्ही अभिनेत्रींना मागे सोडून बॉलिवूड दिवा सुष्मिता सेनने या यादीत बाजी मारली. ही गोष्ट धक्कादायक आहे, पण सर्च इंजिनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सुष्मिताचे नाव या वर्षात बॉलीवूडमधून सर्वाधिक सर्च करण्यात आलेली अभिनेत्री म्हणून समोर आले आहे.

most google searched indian actress 2022 रिपोर्ट्सनुसार, सर्वाधिक सर्च केलेल्या लोकांच्या यादीत सुष्मिता सेन पाचव्या स्थानावर आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर या यादीत स्थान मिळवणारी ती चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुष्मिता सेनचा तिच्या कोणत्याही प्रोजेक्ट, चित्रपट किंवा गाण्यांसाठी शोध घेतला गेला नाही. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, यावर्षी सुष्मिता सेनला ललित मोदींसोबतच्या संबंधांमुळे सर्वाधिक सर्च करण्यात आलं.

हेही वाचा : ‘या’ देशाचा पासपोर्ट आहे जगातील सर्वात शक्तिशाली, जाणून घ्या भारताची रँकिंग काय?

most google searched indian actress 2022 गुगलवर सर्च केलेल्या या यादीत नुपूर शर्मा पहिल्या तर द्रौपदी मुर्मू दुसऱ्या स्थानावर आहे. ऋषी सुनक आणि ललित मोदी या यादीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. वास्तविक, या वर्षी जेव्हा सुष्मिता सेन ललित मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी आली, तेव्हा सुष्मिता सेनची भरपूर सर्च करण्यात आले. दोघांचा एक फोटोही व्हायरल झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues