Take a fresh look at your lifestyle.

Sanjay Raut : दिल्ली घ्या आणि गुजरात सोडा, संजय राऊत असं का म्हणाले?

0

Sanjay Raut दिल्ली महापालिकेत बाजी मारणाऱ्या ‘आप’चे कौतुक करताना संजय राऊतांनी गुजरात निवडणुकीसाठी ‘आप’ आणि भाजपचं साटंलोटं असल्याचा आरोप केला. ते मुंबईत बोलत होते.

Sanjay Raut संजय राऊत म्हणाले, दिल्लीत भाजपच्या 15 वर्षांची सत्ता ‘आप’ने खेचून घेतली, हे कौतुकास्पदच आहे. मात्र मतविभागणी झाली नसती तर आपला आणखी चांगला विजय मिळवता आला असता. पण तरीही आपला जे यश मिळालं आहे ते वाखण्याजोगे असेच आहे. 15 वर्षाची सत्ता खेचून घेणे सोपे नाही,असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा : दिल्लीत ‘आप’च बाप, भाजप आणि काँग्रेस साफ; जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी!

Sanjay Raut दुसरीकडे गुजरातमध्ये आप आणि अन्य पक्षांनी आघाडी केली असती तर इतकी अटीतटीची लढत झाली असती. पण दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा असं काही तर झालं असावं, अशी लोकांमध्ये कुजबूज आहे. हिमाचलमध्ये अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस चांगली लढत देत आहे. तीन प्रमुख निवडणुकांमध्ये गुजरात भाजपला मिळाले तर दिल्ली हातातून गेलं आहे. हिमाचलमध्ये संघर्ष करावा लागतोय, असंही राऊत यांनी म्हटलं.

Sanjay Raut सध्या गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपची सत्ता आहे. सकाळी हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार गुजरातमध्ये भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरू आहे. तर हिमाचलमध्ये कॉंग्रेसने जोरदार टक्कर दिल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues