Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

0

Maharashtra Weather Updates बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या क्षेत्राचे काल संध्याकाळी उशिराने चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाला ‘मंदोस’ अस नाव देण्यात आले असून या चक्रीवादळाचा फटका प्रामुख्याने महाराष्ट्रसह-दक्षिणेकडील राज्यांना बसणार असल्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Updates हे चक्रीवादळ 8 तारखेला म्हणजे आज तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता असून या भागातील 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर याचा परिणाम महाराष्ट्रात देखील पाहायला मिळू शकतो अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामधील राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्र यांना 8 व 9 तारखेला हलक्या पावसाची शक्यता असून इतर बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.

हेही वाचा : दरमहा 55 रुपये जमा करा आणि वार्षिक 36 हजारांची पेन्शन मिळवा!

Maharashtra Weather Updates दरम्यान, या चक्रीवादळाचा परिणाम देशातील अनेक राज्यांवर 11 डिसेंबरपर्यंत राहणार असून 9 डिसेंबरला दक्षिणेकडील राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दक्षिण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांना याचा फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues