Take a fresh look at your lifestyle.

Job Update : एकीकडे संपूर्ण जगात मंदी पण भारतातील या नामांकित ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी!

0

सध्या जगभरातल्या अनेक लहान-मोठ्या नामांकित कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू केला आहे. परंतु एकीकडे संपूर्ण जगात मंदी असताना भारतातील ‘मॅकडोनाल्ड्स इंडिया’ (mcdonald job requirements) ने 5000 जागांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मॅकडोनाल्ड्स इंडिया’ (McDonald India) कंपनीने भारतात आपला विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ‘मॅकडोनाल्ड’चे (उत्तर आणि पूर्व) व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन (Rajiv Ranjan) यांनी दिली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या तीन ते चार वर्षांत उत्तर आणि पूर्व भारतात 300 रेस्टॉरंट्सचा टप्पा ओलांडण्याचं उद्दिष्ट कंपनीने ठेवलं असून या प्रदेशातल्या आपल्या आउटलेट्सची संख्या दुप्पट करण्यासाठी नवीन पाच हजार जणांना कामावर घेतलं जाणार असल्याचे कंपनीने सांगतले आहे.

हेही वाचा :- सर्वात महागडा चित्रपट अवतार-2 ची कथा कशी सुचली?

एवढेच नव्हे तर याचाच एक भाग म्हणून मॅकडोनाल्ड्सने गुवाहाटीत (guwahati) भारतातलं सर्वांत मोठं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. हे रेस्टॉरंट 6700 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या असून यामध्ये एकाच वेळी 220 ग्राहकांना सेवा देण्याची क्षमता आहे.

दरम्यान, व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन यांनी हि भरती कधी सुरु होणार आहे याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार असण्याचे सांगतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues