Take a fresh look at your lifestyle.

Avatar: The Way of Water : सर्वात महागडा चित्रपट अवतार-2 ची कथा कशी सुचली?

0

जगातील सर्वात महागडा चित्रपट अवतार – द वे ऑफ वॉटर (Avatar: The Way of Water) 16 डिसेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च सुमारे 2 हजार कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कल्पना एका स्वप्नातून आली आहे. त्याचे असे झाले की, चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron) यांच्या आई शर्ली यांना एक स्वप्न पडले. यात त्यांना 12 फुट उंचीची निळ्या रंगाची एक महिला दिसली. आईने या स्वप्नाबद्दल जेम्स यांना सांगितल्यावर त्यांना एका अशा ग्रहाची कल्पना सुचली ज्यावर निळ्या रंगाचे लोक राहतात. त्यांची उंची 10 ते 12 फुट असते. हा तो काळ होता जेव्हा जेम्स यांनी टायटॅनिकविषयी विचार सुद्धा केला नव्हता.

यानंतर त्यांनी आधी टायटॅनिक तयार केला आणि तब्बल 12 वर्षांनंतर अवतार(Avatar) हा चित्रपट आला. अवतारच्या 13 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याचा दुसरा भाग येतोय. अवतारच्या पूर्वी टायटॅनिक जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. नंतर 2009 मध्ये आलेल्या अवतारने सर्व विक्रम मोडित काढले. फक्त टायटॅनिकच नव्हे तर जेम्स कॅमेरून यांनी चित्रपटांत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक प्रयोग केले. त्यांचा पहिला चित्रपट टर्मिनेटर ते अवतार -2 पर्यंतची त्यांची कारकीर्द आणि चित्रपट बनवण्याची पद्धत आश्चर्यकारक आणि चर्चित राहिली आहे. विशेष बाब ही आहे की जेम्स आपला चित्रपट लिहिल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचाही स्वतःच शोध लावतात.

अवतार या चित्रपटासाठी कॅमेरून यांनी 2006 मध्ये कथेवर पुन्हा काम केले आणि चित्रपटात दाखवलेल्या एलियन्ससाठी नवी भाषा तयार केली. अमेरिकेतील भाषातज्ज्ञ डॉ. पॉल फ्रॉमर यांनी ही भाषा तयार केली. या भाषेसाठी 1 हजार शब्द तयार करण्यात आले होते. यात जेम्स कॅमेरून यांनी 30 शब्द टाकले होते. या चित्रपटासाठी कॅमेरून यांनी सेटअपही वेगळा केला होता.

हेही वाचा : 16 डिसेंबर हा दिवस भारतासोबत या देशात देखील विजय दिवस म्हणून करतात साजरा..!!
मोदी सरकारने कृषी बजेट वाढवले, आता 6.22 लाख कोटी रुपयांची तरतूद

अॅनिमेशन, VFX आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेला अवतार-2 दोन हजार कोटींच्या खर्चातून तयार केला जात आहे. यासोबतच ही जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडी फ्रँचायजी ठरत आहे. याचे पूर्ण 5 भाग तयार करण्यासाठी 11 हजार 200 कोटी रुपये खर्च केले जातील. यासोबतच ही जगातील सर्वाधिक बजेटची फ्रँचायजी होईल. कॅमेरून याच्या 6-7 सीरिजही तयार करू शकतात. ते म्हणाले की हा निर्णय चित्रपटाची कमाई आणि प्रेक्षकांच्या मागणीवरून घेतला जाईल.

अवतार-2 चित्रपटाने अॅडव्हान्स बूकिंगमध्येज बाजी मारली आहे. चित्रपटाची आतापर्यंत 4 लाख तिकिटे विकण्यात आली आहेत. असाही अंदाज लावला जात आहे की चित्रपट पहिल्या दिवशी जगभरात 180 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1 हजार 400 कोटींची कमाई करू शकतो. हा चित्रपट जगभरातील 52 हजार आणि भारतात 3 हजार स्क्रिन्सवर रिलीज केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues