Take a fresh look at your lifestyle.

Market Update : सोने खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी मोठी बातमी; 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार

0

Market Update : सोने खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण हॉलमार्किंगबाबत केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. जो सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीदारांना शुद्धतेची हमी देतो.

केंद्र सरकारने म्हटले आहे की, 1 एप्रिल 2023 पासून सोन्याचे दागिने 6 अंकी कोड असलेल्या हॉलमार्किंगशिवाय कुठेही विकले जाणार नाहीत. ग्राहक हितासाठी हा महत्वपूर्ण निर्णय ग्राहक व्यवहार विभागाने घेतला आहे. म्हणून आता 31 मार्चनंतर हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे.

येत्या 1 एप्रिलपासून सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींवर 6 अंकी कोड (HUID) नसला तर त्याची विक्री केली जाणार नाही. खेड्यातील दुकाने, शहरे आणि लहान दुकानांमध्येही गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक ऍप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues