Take a fresh look at your lifestyle.

Electricity inflation : नव्या वर्षात सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता, लवकरच वीजदरवाढ होणार!!

0

वाढत्या महागाईने (inflation) होरपळून निघालेल्या सामान्य जनतेसाठी हि बातमी महत्वाची.. कारण लवकरच सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा (Electricity inflation) शॉक लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण, ‘महानिर्मिती’ आणि ‘महापारेषण’ कंपन्यांनी दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगापुढे फेर आढावा याचिका सादर केल्या आहेत. या याचिकांना मंजुरी मिळाल्यास सर्वसामान्यांना आर्थिक पैशांचा बोजा पडणार आहे.

या याचिकेत नेमके काय?

राज्य वीज नियामक आयोगाने 30 मार्च 2020 रोजी पुढील पाच वर्षांसाठी (मार्च 2025अखेर पर्यंत) बहुवर्षीय वीजदरनिश्चितीचा आदेश जाहीर केला आहे. कायद्यातील या तरतुदीनुसार तिसऱ्या वर्षी वीज कंपन्यांना फेर आढावा याचिका दाखल करता येते. त्यानुसार, ‘महानिर्मिती’ व ‘महापारेषण’ या दोन कंपन्यांनी दरांच्या फेर आढाव्यासाठी याचिका आयोगापुढे दाखल केल्या आहेत.

यानंतर आयोगापुढे ‘महानिर्मिती’ आणि ‘महापारेषण’ कंपन्यांनी दरवाढीसाठी राज्य वीज नियामक फेर आढावा याचिका सादर केल्या आहेत. या याचिकांना मंजुरी मिळाल्यास वीज ग्राहकांवर प्रति युनिट 01 रुपया 35 पैशांचा बोजा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगतले आहे.

दरम्यान, या प्रचंड दरवाढीचा बोजा पडल्यास राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांना परवडणार नाही. महागड्या वीजदरांमुळे राज्यामधील उद्योग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये टिकू शकणार नाहीत. याचा राज्याच्या विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यावर राज्य सरकारने गांभीर्याने कठोर उपाययोजना कराव्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues