Take a fresh look at your lifestyle.

Krushidoot.com जगातील सर्वात मोठ्या कुंटूंबाचा ‘बाप’ हरपला, 54 मुले आणि 6 बायका झाल्या पोरक्या

0

जगातील सर्वात मोठ्या कुंटूंबाचा ‘बाप’ अर्थात अब्दुल मजीद मंगल यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. अब्दुल यांना 54 मुले आणि 6 बायका असल्याने ते कायम चर्चेत असतं. मात्र हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते पाकिस्तानातील नोश्की जिल्ह्यातील रहिवासी होते. ट्रकचालक म्हणून काम करणारे अब्दुल यांचे वयाच्या 18 व्या वर्षी पहिले लग्न केले होते. अब्दुलने एकूण सहा विवाह केले होते. यातील दोन पत्नींचे यापूर्वीच निधन झाले आहे. मजीदच्या 54 मुलांपैकी 12 मुले ते जिवंत असतानाच मरण पावली. तर 22 मुले आणि 20 मुलींसह 42 मुले आजही जिवंत आहेत.

ब्दुलचा मुलगा शाह वली याने माहिती देताना सांगितले की, 54 मुलांच्या गरजा भागवणे सोपे काम नव्हते, पण आमच्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट केले होते. म्हातारपण असूनही त्यांनी मृत्यूच्या पाच दिवस आधीपर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाडी चालवली. शाहने वडिलांना कधीही आराम करताना पाहिले नाही, मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवण्याचा प्रयत्न केला. ते सतत काही ना काही काम करत असे.

हेही वाचा : नोकर नव्हे उद्योजक बना! ‘हा’ व्यवसाय करून महिन्याकाठी कमवा 50 हजारापर्यंत इनकम

शाह पुढे म्हणाला, आपल्यापैकी काहींनी बीएपर्यंत, तर काहींनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेा आले. पण आमच्याकडे नोकऱ्या नाहीत. आर्थिक विवंचनेमुळे वडिलांवर योग्य उपचार होऊ शकले नाहीत. सरकारी मदतही मिळाली नाही. दुसरीकडे, भीषण पुरामुळे घर उद्ध्वस्त झाले. एकाच वेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या मोठ्या कुंटूंबासाठी झटणारा आधारवड आता हरपल्याने कुटूंबीय हतबल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues