Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Shikhar Dhawan शिखर धवनची वनडे कारकिर्द संपली? दिनेश कार्तिक नक्की काय म्हणाला…

0

बांगलादेशविरोधातील नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत सलामीवीर शिखर धवन चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. संघात पुनरागमन केल्यानंतर शिखर धडाकेबाज कामगिरी करेल, अशी क्रिकेट चाहत्यांना आशा होती. मात्र धवनने तीन सामन्यांमध्ये अनुक्रमे 7, 8 आणि 3 धावा केल्या. भारताने ही मालिका 1-2 ने गमावली. तर दुसरीकडे रोहित शर्माला दुखापत झाल्याने संघात स्थान मिळालेल्या ईशान किशनने द्विशतक ठोकलं. यादरम्यान बांगलादेश दौऱ्यात संघात स्थान न मिळालेल्या दिनेश कार्तिकने शिखर धनवच्या भविष्यासंबंधी मोठं भाष्य केलं.

ईशान किशन, शुभमन गिल यांच्यासारख्या तरुण खेळाडूंची उमदा कामगिरी पाहता शिखर धवनच्या वन-डेमधील एका चांगल्या कारकिर्दीचा हा वाईट शेवट असू शकतो, असं विधान यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने केलं आहे.

श्रीलंका दौऱ्यात शिखर धवनचं स्थान काय असेल? निवड समिती ईशान किशनला संघाबाहेर कसं ठेवणार? हे पाहणं औत्सुक्याचं असेल. दुसरीकडे शुभमन गिलही चांगला खेळत आहे. जर रोहित शर्मा उपलब्ध असेल तर कोणाला विश्रांतीसाठी धवनचा नंबर लागू शकतो. त्यामुळे त्याच्या दिव्य कारकिर्दीचा हा अखेर असू शकतो. पण निवडकर्त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे, असं विधान दिनेश कार्तिकने एका वृत्तसंस्थेशी बोलताना केलं.

2023 रोजी भारतात विश्वचषक स्पर्धा पार पडणार असून यावेळी धवनला संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असंही कार्तिकने म्हटलं. जर शुभमन गिल संघाचा भाग असता तर कदाचित तो सलामीला उतरला असता. तसेच तो गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. जेव्हा ईशान किशनला संधी मिळाली आहे, तेव्हा त्याने दोन्ही हातांनी घेतली आणि सोनं केलं. यामुळे शिखर धवनची कारकिर्द अडचणीत येईल, असंही कार्तिकने सांगितलं.

हेही वाचा : झोपताना स्मार्टफोन वापरताय? सावधान, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

गेल्या काही वर्षांपासून शिखर धवन भारतीय संघाच्या फक्त वन-डे संघाचा भाग आहे. टी-20 आणि कसोटीमध्ये त्याला विश्रांती देण्यात आली आहे. वन-डे मध्ये त्याने अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्वही केलं आहे. मात्र आता त्याची कारकिर्द संपल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews