Take a fresh look at your lifestyle.

Ishan Kishan : द्विशतक ईशान किशनचे पण चर्चा करून नायरची का होतेय?

0

Ishan Kishan भारत-बांगलादेश दरम्यान अखेरच्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर ईशान किशनने अवघ्या 126 चेंडूत द्विशतक ठोकले. यासह त्याने सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला. याअगोदर हा विक्रम वेस्टइंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर होता. ईशानच्या कामगिरीने सर्वांची वाहवा मिळाली असली तर सोशल मीडियावर मात्र कसोटीवीर करून नायरची जोरदार चर्चा सुरू आहे.

Ishan Kishan द्विशतक ईशान किशानचे पण चर्चा करून नायरची का होतेय? असं प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे उत्तर करून नायरने केलेल्या ट्विटमध्ये आहे. कसोटीवीर फलंदाज करून नायरने शनिवारी एक ट्विट केले. ज्यामध्ये त्याने लिहिले की, Dear cricket, give me one more chance.. त्याचं हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होताना दिसतंय. ट्विटमध्ये करूण नायर बीसीसीआय आणि सिलेक्टर्सला विनंती करताना दिसतोय.

हेही वाचा : ईशान किशनची वादळी खेळी, विस्फोटक फलंदाजी करत तोडले अनेक रेकॉर्ड

Ishan Kishan 2016 मध्ये चेन्नईच्या स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात करुण नायरने त्रिशतक झळकावलं होतं. इंग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या डावात 477 धावा केल्या होत्या. भारताने पहिला डाव 7 गड्यांच्या मोबदल्यात 759 धावा करून घोषित केला होता. त्यानंतर त्याचं नाव इतिहासाच्या पानावर नोंदवलं गेलंय. मात्र, हाच करूण नायर आजही टीम इंडियामध्ये खेळण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्याला अजूनही म्हणावी तशी संधी मिळाली नाही, यामुळेच त्याच्या मनातील खदखद बाहेर पडली आहे.

19 डिसेंबर 2016 अजिंक्य रहाणेच्या जागेवर करुण नायरला संधी मिळाली. त्याने त्या संधीचं सोनं देखील केलं. विरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक झळकावणार केवळ दुसरा भारतीय फलंदाज आहे. मात्र जवळपास 6 वर्षे झाली तो आजही संधीच्या प्रतिक्षेत आहे. यामुळे सोशल मीडियावर लोक त्याला सपोर्ट करताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues