Take a fresh look at your lifestyle.

Carbon Negative Seed Farm : ‘या’ ठिकाणी आहे देशातील पहिले कार्बन निगेटिव्ह बियाणे फार्म, जाणून घ्या सविस्तर

0

Carbon Negative Seed Farm केरळमधील कोचीजवळ असणारे स्टेट सीड फार्म अलुवा हे कार्बन नकारात्मक दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले बियाणे फार्म बनलेय. या ठिकाणी केल्या जाणाऱ्या एकात्मिक शेती पद्धतीमुळे काम अनेक पटींनी सोपे झाले आहे.

Carbon Negative Seed Farm हल्ली एकात्मिक शेती पद्धतीमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले आहे, सोबत पर्यावरणाचे रक्षण आणि जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठीही ती उपयुक्त ठरतेय. केरळमधील कोचीजवळील स्टेट सीड फार्म अलुवानेही हे लक्ष्य गाठल्याने ते देशातील पहिले कार्बन न्यूट्रल सीड फार्म म्हणून उदयास आले आहे. या ठिकाणी कार्बन न्यूट्रल असण्याचा अर्थ असा आहे की शेतीच्या कामातून मिळणारे अवशेष जैव-विघटनशील आहेत, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.

Carbon Negative Seed Farm पशुपालनासारख्या अनेक कृषी उपक्रमातून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित होतो. अनेक वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की प्राण्यांपासून भरपूर कार्बन उत्सर्जन होत आहे, जे हरितगृह वायूच्या 14 टक्के आहे. तसेच शेतीमध्ये विजेच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनात 22 टक्क्यांनी वाढ होते. बिझनेसलाइनच्या रिपोर्टनुसार, हे 103 वर्षे जुने सीड फार्म पेरियारच्या काठावर 13.5 एकर जमिनीवर आहे.

Carbon Negative Seed Farm केरळ कृषी विद्यापीठाच्या हवामान बदल आणि पर्यावरण विज्ञान विभागाच्या संशोधनानंतर या शेतीला कार्बन न्यूट्रलचा दर्जा मिळाला. शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनात, अलुवा राज्य बियाणे फार्ममधील कृषी क्रियाकलापांमधून कार्बन उत्सर्जन आणि कार्बन संचयनाचे मूल्यांकन केले गेले. यातून असे दिसून आले की अलुवा सीड फार्ममध्ये कार्बन उत्सर्जन 43 टन आहे, तर येथे नोंदवलेला कार्बन साठा 213 टन आहे.

कोचीच्या या राज्य बीज फार्ममध्ये अनोखी शेती केली जात असून या शेतीला कार्बन न्यूट्रल म्हणजेच कार्बन निगेटिव्हचा दर्जा मिळाला आहे. आता लवकरच केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे शेत कार्बन न्यूट्रल म्हणून घोषित करतील. या राज्य बियाणे फार्मचे कृषी संचालक जे वडाकट्टी सांगतात की 2012 पासून येथे एक सेंद्रिय युनिट चालवले जात आहे, ज्याच्या मदतीने कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होते. येथे प्राण्यांच्या मिश्र जातींना प्रोत्साहन दिले जात आहे.

महत्वाच्या बातम्या : अवकाळी पाऊस आला तर फळबागा आणि भाजीपाला पिकांची कशी काळजी घ्याल?

या जनावरांमध्ये गाय, बकरी, कोंबडी, बदक तसेच मत्स्यपालन, आजोला लागवड आणि गांडूळखत युनिटही बसविण्यात आले आहे. येथील मुख्य पीक भात हे 7 एकर क्षेत्रावर घेतले जात आहे. भाताच्या बंपर उत्पादनाबरोबरच रक्तशाली, नजवारा, जपान व्हायलेट, पोक्कली या जातींचे बियाणेही या बीज फार्ममधून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. अशा प्रकारे हे फार्म मल्टी टास्किंग युनिटसारखे काम करत आहे.

विशेष बाब म्हणजे या सीड फार्मचे स्वतःचे असे एक सायकल आहे, ज्यामध्ये गाय, बकरी, बदक, कोंबडी, मासे, मधमाश्या पाळण्याबरोबरच गांडूळ खत युनिट बसवल्याने कचऱ्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. खत म्हणून शेतीमध्ये वापरले जाते. धानावरील कीड नियंत्रणासाठी बदक आणि कोंबड्यांचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर जनावरे वाढवण्यासाठी चारा, गवत व जनावरांचा चाराही शेतातून बाहेर पडत आहे. दुसरीकडे या प्राण्यांच्या अवशेषांपासून गांडूळखत युनिट सुरू आहे आणि अझोला लागवडीमुळे पशुखाद्य आणि धान पीक उत्पादनात मदत होते. अशाप्रकारे हे कार्बन निगेटिव्ह फार्म (शेत शून्य कचरा फार्म) बनले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues