Take a fresh look at your lifestyle.

Ind vs sl t20 : आज रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका T20 सामना; जाणून घ्या सामना नेमका कधी होणार सुरु

0

भारत आणि श्रीलंका (india vs sri lanka 2023) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जणार असून मायदेशात प्रथमच भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे (hardik pandya) असणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताचे युवा खेळाडू या मालिकेत कशी कामगिरी करतात याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, आजचा भारत विरुद्ध श्रीलंका सामना हा संध्याकाळी 7 च्या सुमारास खेळवला जाणार असून या सामन्याचे थेट प्रक्षेपण हेस्टार स्पोर्टस 1, 2,1 हिंदूी (संबंधित इतर एचडी वाहिन्यावर असणार आहे).. आजपर्यंत भारतानं घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध एकूण 14 टी-20 सामने खेळले आहेत. यातील 11 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यात श्रीलंकेच्या संघाला बाजी मारता आली. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरला आहे.

कसं असेल श्रीलंकेचा भारत दौरा?
येत्या 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका सुरू होणार आहे. हा सामना मुंबईत होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 5 जानेवारीला पुण्यात आणि 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर लगेच 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरूवात होईल. पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटी येथे होणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारीला आणि तिसरा सामना 15 जानेवारीला होणार आहे.

भारताचा टी-20 संघ :
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.

श्रीलंकेचा टी-20 संघ :
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues