Take a fresh look at your lifestyle.

Ind vs Nz 3rd ODI : श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज; टीम इंडियामध्ये बदल होणार का?

0

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड (india vs new zealand) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. यात भारताने मालिकेतील दोनही सामने जिंकून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना होणार असून हा सामना जिंकून न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

या मालिकेत खेळवण्यात आलेला पहिला सामना भारताने 12 धावांनी जिंकला असून रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही भारताने न्यूझीलंडला गुडघे टेकायला भाग पाडले आणि 8 विकेट्सने सामना जिंकला. या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांसह गोलंदाजांनीही उत्कृष्ट कामगिरी राहिली आहे. यानंतर आजच्या तिसऱ्या व अंतिम सामन्यात भारतीय संघ जिंकल्यास श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला व्हाईट वॉश देईल.

व्हाईट वॉश किंवा क्लीन स्वीप म्हणजे काय?
संपूर्ण मालिकेतील प्रत्येक सामन्यात एका संघाने दुसऱ्या संघाचा पराभव करून दुसऱ्या संघाला एकही सामना जिंकण्याची संधी दिली नाही, तर त्याला व्हाईट वॉश किंवा क्लीन स्वीप म्हणतात, या दोन्हीचा अर्थ एकच आहे.

भारताचे संभाव्य प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

न्यूझीलंडचे संभाव्य प्लेइंग -11: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (c/wk), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues