Take a fresh look at your lifestyle.

Bhima Agriculture Exhibition : 26 जानेवारीपासून सुरु होणार भीमा कृषी प्रदर्शन; 12 कोटींचा रेडा अन् 31 लिटर दूध देणारी म्हैस मुख्य आकर्षण

0

Kolhapur News : शेतकऱ्यांना ‘लोकल टू ग्लोबल’ एकाच व्यासपीठावर वैविध्यपूर्ण माहिती देणारे भीमा कृषी प्रदर्शन (Bhima Agriculture Exhibition) गुरुवारपासून सुरु होणार आहे. हे प्रदर्शन रविवारी 29 जानेवारीपर्यंत असेल. मेरी वेदर मैदानावर हे प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शानाचे उद्‍घाटन पालकमंत्री दीपक केसरकर आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील chandrakant Patil यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली.

Govt Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! आता बिझनेस सेट करण्यासाठी सरकारकडून मिळणार 15 लाख

या प्रदर्शनात आधुनिक शेती, पशुपालन, कृषी उत्पादने यांची विविध दालने असतील, तसेच सेंद्रिय शेती, गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, मत्स्यपालन याचे प्रात्यक्षिक बघायला मिळणार आहेत.

Kolhapur News तसेच प्रदर्शनामध्ये 250 जनावरे असतील. यामध्ये तब्बल 12 कोटी किंमतीचा जगातील सर्वांत उंच बादशाह रेडा आणि प्रतिलिटर 31 लिटर दूध देणारी बिजली म्हैस हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

Kolhapur News कोरोनामुळे दोन वर्षे हे भीमा कृषी प्रदर्शन घेता आले नाही. मात्र, यंदा शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा ही पर्वणी उपलब्ध झाली आहे. प्रदर्शनात ड्रोन टेक्नॉलॉजीची माहिती देणारे दालन आहे.
Kolhapur News प्रदर्शनात तृणधान्याचे प्रकार, उत्पादने, खाद्यपदार्थ यांची माहिती देणारे स्वतंत्र दालन येथे असणार आहे. म्हशी, रेडे, गायी, बैल, शेळ्या, कोंबड्या, परदेशी पक्षी प्रदर्शनात असतील. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Desi Cow Breed : लाल कंधारी गायीचे पालन करा, भरघोस दूध उत्पादन

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues