Take a fresh look at your lifestyle.

कलिंगडाच्या शेतीतून 51 लाखांचे उत्पन्न; वाचा यशोगाथा

0

कलिंगडाच्या शेतीतून लाखांचे उत्पन्न नक्की कसे मिळाले? कुणाला मिळाले? त्यासाठी विशेष काय प्रयत्न केले? यासारख्या अनेक गोष्टी या लेखात आज आपण पाहणार आहोत.

लाखोंचे उत्पन्न घेणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे सुनील चव्हाण. ते सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी पारंपारिक ऊस, केळी या पिकांना बगल देवून कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

त्यांनी पाणी, खते आणि किडनाशक फवारणींचे सुयोग्य नियोजन केले. त्यातून त्यांनी सहा एकरातून 150 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले. त्यांच्या दर्जेदार कलिंगडाला तब्बल 34 रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला आहे बरं.

लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या अवघ्या 51 दिवसांमध्ये त्यांना 51 लाखाचे उत्पादन मिळाले आहे. त्यांचा निर्यातक्षम कलिंगड शेतीचा हा प्रयोग आजघडीला इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श असाच आहे.

चव्हाण यांनी जून महिन्यात एकूण 6 एकर क्षेत्रामध्ये 35 हजार कलिंगड रोपांची लागवड केली. या लागवडीपूर्वी त्यांनी शेतीची मशागत करुन शेणखत वापरले. त्यानंतर ठिबकसिंचन देखील केले. तसेच खते, पाणी आणि किड रोग नियंत्रण फवारण्यांचे सुयोग्य नियोजन केल्याने त्यांना सहा एकरातून 150 टन कलिंगडाचे उत्पादन मिळाले. लवकरच त्यांचे चवदार कलिंगड परदेशात निर्यात होणार आहे.

अवघ्या काही दिवसांपूर्वी चव्हाण यांच्या कलिंगडाची तोडणी झालीय. त्यांनी 2 किलोपासून ते 8 किलो वजनापर्यंतच्या कलिंगडाची विक्री केली. यासाठी त्यांनी जागेवरती 34 रुपये किलोचा भाव मिळाला. त्यांना एकर कलिंगडासाठी तब्बल चार लाख रुपयांचा खर्च आला. एकूण खर्च वजा जाता त्यांना तब्बल 47 लाख रुपयांचा नफा मिळालाय. गेल्या तीन वर्षापासून सातत्याने ते कलिंगडाची लागवड करत आहेत. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे त्यांना जेमतेम 10 ते 20 रुपये दर मिळाला होता. यावर्षी मात्र कलिंगड पिकातून त्यांना बंपर लाॅटरी लागलीय.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.