Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नवजात करडांची काळजी कशी घ्यावी…

0

१) जन्मानंतर नवजात करडांची पहिल्या २४ तासांत विशेष काळजी घ्यावी लागते.


२) या वेळी करडांना जास्त ऊर्जेची गरज असते तसेच नवीन वातावरणातील बदलाशी जुळवून घेणे महत्वाचे
असते.

३) शेळी व्यायल्यानंतर तिच्या पिल्लांना चाटून स्वच्छ व कोरडे करते जर असे दिसून आले नाहीतर मात्र
अशा वेळी कोरड्या टॉवेलने फडक्याने किंवा वाळलेल्या मऊ गवताने करडांचे शरीर कोरडे करावे, करडांचे
शरीर कोरडे करतांना होणाऱ्या घर्षणामुळे श्वासोच्छावास व्यवस्थित होण्यास मदत होते.

४) जन्मानंतर पहिल्या २० मिनिटांत पिल्ले उभे राहुन दुध पिण्यासाठी प्रयत्न करतात.

५) जर पिल्ले अशक्त असतील तर त्यांना चीक पिण्यासाठी आपल्या मदतीची गरज असते.

६) करडांची नाळ २ ते ३ इंच अंतरावर निर्जंतुक कात्री किंवा ब्लेडने कापून त्यास टिंक्चर आयोडीन किंवा
जंतुनाशक लावावे.

पीक कर्ज योजना | पीक कर्ज कसं मिळतं? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?

७) करडांच्या नाळेमधुन जंतुसंसर्ग होणार नाही त्यासाठी आधीच गोठ्यात जंतुनाशकाची फवारणी करून
घ्यावी.

८) नवजात करडांना जन्मानंतर तासाभरात चिक पाजावा. करडास स्वतःहून व्यवस्थित पिता येत नसल्यास
चिक बाटलीत काढून निपल असणाऱ्या बॉटलने पाजावा.

७) करडाच्या वजनाच्या १० टक्के चिक दिवसातून ३ ते ४ वेळा विभागून पिण्यास द्यावा. या चिकातून
करडाच्या वाढीसाठी असणारी प्रथिने, जीवनसत्त्व, लोह, इत्यादी घटक मुबलक प्रमाणात असतात.

८) चिक पाजून झाल्यानंतर त्या करडांचे तोंड कापडाने पुसून घ्यावे किंवा पाण्याने धुवून घ्यावे. कारण
चिकटपणामुळे माशा, मुंग्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

९) नवजात करडांना थोड्या थोड्या अंतराने दिवसातून तीन ते चार वेळा दूध पाजणे गरजेचे असते.

१०) नवजात करडास पाच दिवसानंतर करडांच्या वजनाच्या १०० टक्के दूध पाजावे.

११) करडाच्या आईस दूध नसेल तर दुसऱ्या शेळीचे किंवा गायीचे दूध पाजावे.

१२) जुळ्या व तीळ्या करडांच्या बाबतीत शेळीला दुधाची कमतरता भासते अशावेळी उच्चप्रतिचे प्रथिने
असलेला खुराक करडांना द्यावा.

१३) करडे वयाच्या १ ते २ आठवड्यापासून चारा खाण्यास सुरवात करतात. (उदा. वाळलेले गवत, लसूण
घास, शेवरी, सुभाबुळ) यासारखा कोवळा, लुसुशीत चारा करडांना द्यावा.

१४) लहान करडांना एकदम हिरवा किंवा कोवळे गवत खाण्यास देऊ नये. कारण हगवण तसेच आंत्रविषार
होण्याची शक्यता असते.

१५) करडू २५ दिवसाचे झाल्यास (२५ ग्रॅम) खुराक द्यावा. वाढत्या वयाबरोबर दैनंदिन आहारातील खुरकाचे
प्रमाण 50 टक्के पर्यंत वाढवावे.

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

राहुल द.गलंडे, नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews