Take a fresh look at your lifestyle.

जनावरांच्या आहारात बुरशीयुक्त चारा येण्याची प्रमुख कारणे

0

▪️ पशुखाद्द्य तसेच भरड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धान्यास बुरशी लागलेली असल्यास.
▪️ पावसात भिजलेला खुराक किंव्हा सरकी पेंढ काही दिवसानंतर जनावरांना खाऊ घातल्यास.
▪️ पशुखाद्य किंवा पेंढ यांचा पाण्याशी संपर्क आल्यास किंवा खाद्य पावसात भिजल्यास.
▪️ पशुखाद्द्य किंवा धान्याची साठवणूक अति दमट ठिकाणी अधिक काळ केल्यास.
▪️ चारा पूर्णपणे वाळलेला नसताना रचून ठेवल्यास किंवा वाळलेला चारा पावसात भिजल्यास.
▪️ वाळलेला चारा उदा.ज्वारीचा, बाजरीचा कडबा, मका, कडवळ, गहू, तूर, हरभरा, सोयाबीनचा भुसा
पावसात किंवा पाण्याने भिजल्यास.
▪️ कोरडा चारा म्हणून गहू, तूर,हरभऱ्याच्या भुसावर प्रक्रिया करताना कल्चरचे प्रमाण कमी-जास्त
स्वरूपात झाल्यास.
▪️ हिरव्या चाऱ्यामध्ये रसशोषक कीटकांचा तसेच अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ते जनावरांच्या
खाण्यात आल्यास.
▪️ मुरघासास तयार करताना व पाण्याचे प्रमाण लक्षात न घेतल्यास.
▪️ मुरघासाच्या बंकरला पायथ्याला १ फुटाचा उतार न दिल्यास.चाऱ्यातील पाणी खाली साचून राहते
त्यामुळे तळपायातील मुरघास काळा पडतो.
▪️ मुरघासामध्ये टाकण्यात येणाऱ्या कल्चरचे प्रमाण कमी जास्त झाल्यास. तसेच बंकरमध्ये मुरघास
तयार करतांना पूर्णपणे हवा बंद न झाल्यास.
▪️ बॅगेतील मुरघास केल्यानंतर ५ दिवसांनी त्या बॅगेमधील हवा बाहेर न काढल्यास.
▪️ मुरघासाच्या पिशवीत, खड्डयात, किंवा बंकरमध्ये पावसाचे पाणी किंवा हवा शिरल्यास.
▪️ तयार झालेला मुरघास जनावरांना खायला दिल्यानंतर बॅग चांगली बंद न केल्यास.
▪️ मुरघास तयार करतांना रोगयुक्त किंवा बुरशी लागलेली चारा पिके जनावरांनी खाल्ल्यास.
▪️ हॉटेलमधील किंवा समारंभातील उरलेले तसेच बुरशी लागलेले अन्न जनावरांना खाऊ घातल्यास.
▪️ कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ उदा. मोलासेस, बार्ली इत्यादी जनावरांना खाऊ घातल्याने.

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues