Take a fresh look at your lifestyle.

आता बँक बॅलन्स चेक करण्यासाठी बँकेच्या अप्लिकेशनची आवश्यकता नाही; अवघ्या काही क्षणात व्हाट्सअँपवर तुम्हाला दिसणार तुमच्या बँकेत पैसे किती..? ते नेमके कसं शक्य

0

आजकाल जवळजवळ प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. हे प्रामुख्याने चॅटिंगसाठी वापरले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की चॅटिंग व्यतिरिक्त याचे अनेक उपयोग आहेत. WhatsApp आपल्या यूझर्सला अनेक प्रकारच्या सेवा देते. त्यापैकी एक म्हणजे WhatsApp पेमेंट्स. याद्वारे तुम्ही एखाद्याला पैसे ट्रान्सफर करू शकता. यासोबतच तुम्ही तुमचे बँक बॅलेन्स देखील तपासू शकता. तसे कसे तपासावे याविषयी आपण जाणून घेऊया… (how to check bank balance on whatsapp)

Whatsapp वर असे तपासा बँक बॅलेन्स

सर्वात प्रथम तुमच्या फोनमध्ये Whatsapp अकाउंट ओपन करा.

तुम्ही जर अँड्राइड फोन यूजर असाल तर टॉपला More चा पर्याय दिसेल. तर आयफोन यूजर्स सेटिंग्सवर टॅप करा.

येथे तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.

पुढे पेमेंट मेथड संबंधित बँक अकाउंटवर टॅप करा.

आता तुम्हाला View Account Balance चा पर्याय दिसेल.

View Account Balance वर टॅप केल्यानंतर तुम्हाला यूपीआय पिन टाकावा लागेल.

यूपीआय पिन एंटर करताच तुम्हाला अकाउंट बॅलेन्स स्क्रीनवर दिसेल.

या पद्धतीनेही पाहता येईल बँक खात्यातील रक्कम

तुम्ही Whatsapp वर पैसे पाठवताना देखील बँक खात्यातील रक्कम तपासू शकता.

यासाठी Payment Message Screen वर दिलेल्या पेमेंट मेथडवर क्लिक करा.

येथे View Account Balance वर टॅप करा.

जर तुमच्या Whatsapp अकाउंटमध्ये वेगवेगळे बँक अकाउंट अ‍ॅड असल्यास त्यातील संबंधित बँक अकाउंटवर क्लिक करा.

यानंतर तुमचा यूपीआय पिन एंटर करा. आता तुम्हाला बँक खात्यातील रक्कम दिसेल.

WhatsApp पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवा
व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल नंबरद्वारे पेमेंट करण्याची सुविधा देते. प्रायमरी बँक सेटअप दरम्यान, यूझर्सला केवळ पेमेंट अटी आणि गोपनीयता धोरण स्वीकारण्यास सांगितले जाते. व्हॉट्सअ‍ॅपच्या लिस्टमध्ये कोणत्याही बँकेचे नाव दिसत नसेल, तर तुमची बँक अद्याप त्याच्याशी जोडलेली नसण्याची शक्यता आहे. याशिवाय सुरक्षेसाठी तुम्ही नेहमी व्हॉट्सअ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन वापरा.

Children’s School Admission : पालकांनो इकडे लक्ष द्या..!! आता मुलांच्या शाळा प्रवेशासाठी ‘हि’ कागदपत्र महत्वाची

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues