Take a fresh look at your lifestyle.

Children’s school admission : पालकांनो इकडे लक्ष द्या..!! आता मुलांच्या शाळा प्रवेशासाठी ‘हि’ कागदपत्र महत्वाची

0

तुम्ही आपल्या पाल्यासाठी शाळेत प्रवेश घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. कारण आता शाळा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, हे करण्यासाठी शाळांना चाप लावण्याचा सरकारचा विचार आहे. पण याचा त्रास्त हा पालकांना होणार असल्याची चर्चा आहे.

बनावट पटसंख्या दाखवून अनेक शाळा कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटत असल्याच समोर आले आहे. अशा गैरव्यवहार करणाऱ्या शाळांना चाप बसवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनाही आधार कार्ड सक्ती असल्याचं आदेशात म्हटले आहे. शाळेत प्रवेश घेताना आता विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचे आधार कार्डदेखील लिंक केले जाणार आहे. बोगस विद्यार्थी पटसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही ‘आधार’ची सक्ती करण्यात आली आहे.

शाळा प्रवेशाबाबतच्या नवीन मार्गदर्शक सूचना –
▪️ विद्यार्थ्यांचे प्रवेश हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसोबत जोडण्यात यावेत.
▪️ प्रवेश अर्जासोबत पालकांचे सुद्धा आधार कार्ड बंधनकारक असणार
▪️ शाळा व्यवस्थापन समिती ही प्रवेश देखरेख समिती म्हणून काम करेल
▪️ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना शाळांनी पालकांकडून दोन प्रतीमध्ये प्रवेश अर्ज भरुन घ्यावा.
▪️ प्रवेश अर्जावर पालकांची स्वाक्षरी असावी. प्रवेश अर्जावर पालक आणि विद्यार्थ्यांचे फोटो लावलेले असावेत
▪️ प्रवेश अर्जाची एक प्रत केंद्र प्रमुखास देण्यात यावी तर दुसरी एक प्रत शाळा व्यवस्थापन समितीला द्यावा
▪️ शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पटपडताळणी पार पाडावी
▪️ या पडताळणीत दूरुउपयोग आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात यावी
▪️ काही कारणांमुळे पालक आधारकार्ड सादर करु शकले नाही तर अशा प्रकरणांमध्ये पालकांचे आधारकार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues