Take a fresh look at your lifestyle.

Todays Sport Update : क्रीडाप्रेमींसाठी आजचा दिवस सुपर संडे! आज 4 मोठे सामने अन् 3 विजेतेपदाच्या लढती; भारतावर संपूर्ण जगाचे लक्ष

0

क्रीडा प्रेमी आहात? मग तुमच्यासाठी आजचा संडे ठरणार खास पर्वणी.. कारण आजच्या दिवशी टीव्हीवर चार विविध स्पर्धांचे हायव्होल्टेज सामने पाहता येणार आहेत. एवढेच नव्हे तर आज 2 वर्ल्ड कप फायनल देखील पाहायला मिळणार आहेत. हे सर्व रोमांचक सामने आहेत तरी कोणते? कधी आणि कुठे होणार हे सामने? यासाठी हि बातमी सविस्तर पाहूयात… todays sport update

आज सर्वप्रथम रंगणार अंडर-19 महिला विश्वचषक फायनल :

प्रथमच खेळल्या जात असलेल्या आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत महिलांच्या भारतीय संघाने शानदार धडक मारली आहे. आज त्यांचा अंतिम सामना इंग्लंडशी होणार आहे. आजच्या सामन्याची फलंदाजीची संपूर्ण जबाबदारी कर्णधार आणि सलामीवीर शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांच्यावर तर गोलंदाजीत पार्श्वी चोप्राने आपल्या फिरकीने विरोधी फलंदाजांची चांगलीच शाळा घेतली आहे.

हॉकी विश्वचषक अंतिम सामना, जर्मनी विरुद्ध बेल्जियम :

आज हॉकी विश्वचषक अंतिम सामना जर्मनी विरुद्ध बेल्जियम होणार आहे. दोनीही संघ एकपेक्षा एक असल्याने हॉकी विश्वचषक हा अंतिम सामना खूप रोमांचक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया ओपन अंतिम सामना, जिकोव्हिच विरुद्ध सित्सिपास :

पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा सामना आज नोव्हाक जोकोव्हिच आणि स्टेफानोस सित्सिपास यांच्यात होणार आहे. सर्बियन स्टार नोवाकचे लक्ष्य दहाव्या ऑस्ट्रेलियन ओपन आणि एकूण २२व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर असेल. दुसरीकडे, सित्सिपास प्रथमच मेलबर्नमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. ही त्याची एकूण दुसरी ग्रँडस्लॅम फायनल असेल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरा टी-20 सामना :

आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा टी-20 समान खेळवला जाणार असून या सामन्यात भारतीय संघाचे लक्ष्य विजय मिळवणे असेल. या विजयासह मालिकेत आपले स्थान कायम ठेवण्याच्या तयारीनिशी भारत उतरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues