Take a fresh look at your lifestyle.

Health Tips for Acidity : पित्ताचा त्रास आहे? ’हे’ करा!

0

Acidity Hacks : हल्ली बदलत्या हवामानामुळे वारंवार पिताचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी ऐकायला येतात. म्हणून आज पित्ताची सामान्य लक्षणं काय? पित्ताचे प्रकार कोणते? त्यावर उपाय काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

Acidity ची लक्षणे काय? :
पोटात आग किंवा जळजळ होते, पोटात मळमळतं, करपट ढेकर येतात, घशाशी आंबट येतं, उलटी होते, तोंडाची चव कडू किंवा आंबट होते, भूक लागत नाही, खावसं वाटत नाही, डोकं दुखतं, उन्हात जावत नाही, डोळ्यांची जळजळ, चक्कर येणं, लघवीची आग होते, जुलाब होणे.

यामधील काही लक्षणं सोबत अपचन झाल्याचं दर्शवत असली तरी त्या अपचनामागेही पित्तच असल्याचं मानलं जातं. आपल्यासाठी आधी समजावून घेणं गरजेचं आहे की नेमक्या कोणत्या पित्ताने कशा प्रकारचा त्रास होत आहे. यासाठी आधी पित्ताचा प्रकार समजून घ्यावा लागतो.

जेव्हा आग, जळजळ, तोंडाची कडू चव अशी लक्षणं असतात तेव्हा पित्तामधले तेजस गुण वाढीला लागलेले असतात. पित्तामधलं पाणी कमी झालेलं असतं. म्हणून अशा वेळी काय करावे हे पाहूयात…

ऊसाचा रस, कोकम सरबत, लिंबू सरबत प्यावे.
कोमट दूध साखर घालून प्यावे.
तूप साखर किंवा लोणी साखर खावे.
काळ्या मनुका खाव्यात किंवा काळ्या मनुका रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून दुसऱ्या दिवशी त्याच पाण्यात कुसकरून खाव्यात.
दुपारी उन्हात फिरू नये. फिरणे आवश्यक असल्यास डोक्यावर छत्री किंवा टोपी घालावी.

जेव्हा घशाशी आंबट येणं, तोंड आंबणं अशी लक्षण असतात तेव्हा पित्तामधले जलीय गुण वाढलेले असतात. पित्तामधले पाणी वाढलेले असते. ते कमी करावे लागते म्हणून अशा वेळी काय करावे हे पाहूयात…
साळीच्या, ज्वारीच्या लाह्या खाव्यात.
काळ्या मनुका किंवा कोरडा मोरावळा खावा.
आल्याचा रस घातलेलं पाणी प्यावं.
सुंठवडा चघळावा.
कांदा, मूळा किसून त्यांची ताकामध्ये कोशिंबीर करून खावी.
सुंठ-मिरी घातलेला मठ्ठा प्यावा.
मिरपूड लिंबाच्या रसाबरोबर खावी.
वरील उपायांनी पित्ताचा त्रास व्यवस्थित आटोक्यात ठेवता येईल…

Effect Of Going Days Without Sleep : झोपेशिवाय किती दिवस राहू शकतो माणूस; बरेच दिवस डोळे बंद केले नाही तर काय होईल? वाचा सविस्तर

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues