Take a fresh look at your lifestyle.

ESIC योजनेत मिळतंय मोफत उपचारांपासून ते कुटुंब निवृत्ती वेतनापर्यंत, जाणून घ्या कोणाला आणि कोणते फायदे मिळतात?

0

ESIC Scheme : ESIC योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंबाला मोफत उपचार आणि पेन्शन सुविधा दिली जाते.

ESIC Yojana : केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC योजनेच्या नावाने चालवते. ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळतो. अशा कर्मचाऱ्यांना ईएसआय कार्ड दिले जाते.

ESIC Scheme कर्मचारी ईएसआय कार्ड कार्डच्या मदतीने ईएसआय दवाखाना किंवा रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतात. ESIC ची देशभरात 150 हून अधिक रुग्णालये आहेत, जिथे सामान्य ते गंभीर आजारांवर उपचार केले जातात. याशिवाय इतरही काही सुविधा त्याअंतर्गत दिल्या जातात. या अंतर्गत कोणत्या प्रकारचे फायदे दिले जातात आणि कोणते कर्मचारी या अंतर्गत पात्र आहेत ते जाणून घेऊया.

ESIC अंतर्गत कोण पात्र :
ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न 21 हजार रुपये किंवा त्याहून कमी आहे ते याचा लाभ घेऊ शकतात. त्याच वेळी, दिव्यांग व्यक्तींसाठी किमान वेतन मर्यादा 25000 रुपये आहे. याशिवाय, विमा लाभांसाठी कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांच्या वतीने ESI योजनेत योगदान दिले जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून 1.75 टक्के आणि 4.75 टक्के योगदान देण्याचा नियम आहे.

ESIC योजनेंतर्गत कोणते फायदे :
ESIC Scheme या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत उपचाराची सुविधा दिली जाते. या सुविधेअंतर्गत कुटुंबांना मोफत उपचारही मिळू शकतात. उपचारांना मर्यादा नाही.
सेवानिवृत्त कर्मचारी आणि अपंगत्व असल्यास, व्यक्ती आणि त्यांच्या पत्नीला रु. 120 च्या वार्षिक प्रीमियमवर वैद्यकीय सुविधा दिली जाते.
आजारी रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना 91 दिवसांसाठी रोख रक्कम दिली जाते. या दरम्यान, पगाराच्या 70 टक्के दराने रक्कम दिली जाते.
ESI द्वारे प्रसूती रजा देखील दिली जाते, ज्यामध्ये प्रसूतीच्या 26 आठवड्यांपर्यंत महिलांना 100% पगार दिला जातो.
एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ESIC कडून 10,000 रुपये दिले जातात आणि पेन्शनचा लाभ आई-वडील, पत्नी आणि मुलांना दिला जातो.

PM SHRI Yojana : राज्यातील शाळांचं रुपडं बदलणारी ‘पीएमश्री योजना’ राज्यात लागून होणार; मंत्रिमंडळ बैठकीय निर्णय

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues