Take a fresh look at your lifestyle.

भारतातील या ठिकाणी चक्क भारतीयांनाच जाण्याची परवानगी नाही!! हे ठिकाण पाहून तुम्हालाही बसेल धक्का

0

आजच्या पिढीतील बर्‍याच लोकांना प्रवास करायला आवडते. प्रवास करायची आवड झाली तर प्रत्येकालाच असे वाटते की, आपण मनसोक्त कुठेही प्रवास करण्याचा आनंद घेऊ शकतो. पण तुम्ही कधी विचारही केला नसेल, आपण आता ज्या देशात राहतो त्या देशातील काही ठिकाणी आपल्याला जाण्यास बंदी आहे. कोणती आहेत ते ठिकाणे? का आहे तिथे जाण्यास बंदी? जाणून घेऊया थोडक्यात… (indians are not allowed in these places of india only foreigners can enter)

देशातील या ठिकाणी भारतीयांना जाण्यास बंदी :

फॉरेनर्स ओन्ली बीच – गोवा व पोंडेचेरी : गोवा व पोंडेचेरीमध्ये असे अनेक बीच आहेत जेथे भारतीयांना प्रवेश नाकारला जातो. त्यांना फॉरेनर्स ओन्ली बीच म्हटले जाते. याचं कारण देताना या बीचचे मालक सांगतात की, “बिकिनी” घातलेल्या फॉरेन स्त्रियांकडे भारतीय पुरुष अश्लील नजरेने बघतात, ज्यामुळे परदेशी पर्यटकांना त्रास होतो. त्यामुळे गोवा व पोंडेचेरी भागातील फॉरेनर्स ओन्ली बीच वर भारतीयांना प्रवेश नाही आहे.

ब्रॉडलंड हॉटेल (Broadlands Hotel) : चेन्नई येथील या हॉटेलमध्ये फक्त परदेशी नागरिकांना प्रवेश दिला जातो. जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर इथे तुमचे स्वागत आहे, नाहीतर तुम्ही इथे पायही ठेऊ शकणार नाही.

उनो इन हॉटेल (Uno-In Hotel) : बेंगलोरमधील हे एक प्रसिद्ध हॉटेल होते. या ठिकाणी फक्त जपानी लोकांनाच प्रवेश दिला जात असे. मात्र अशा प्रकारच्या भेदभावामुळे हे हॉटेल बंद करण्यात आहे.

मलाना गाव (Malana) : या गावात अलेग्झांडर दी ग्रेटचे सैन्य वास्तव करत असा लोकांचा समज आहे. हे गाव पृथ्वीवरील प्राचीन लोकशाहींपैकी एक आहे. या गावामध्ये स्वतंत्र शासकीय यंत्रणा आहे. सर्वसामान्यांना लागणारी सामग्री स्थानिक नागरिक गावातच तयार करतात. बाहेरील व्यक्तीने इथे प्रवेश केला तर त्याला घुसखोर समजले जाते.

फ्री कसोल कॅफे (Free Kasol Café) : हिमाचल प्रदेशमधील कसोल हे ठिकाण पर्यटकांच्या विशेष पसंतीचे समजले जाते. या ठिकाणाला भेट देणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. या ठिकाणी एक रेस्टॉरंट आहे, ‘फ्री कसोल कॅफे’. या ठिकाणी भारतीय लोकांना येण्यास परवानगी नाही. कसोल या गावाला ‘मिनी इजराईल’ देखील म्हटले जाते, कारण या भागामध्ये इजराईली लोकांची जनसंख्या जास्त आहे.

दरम्यान, जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील भारताची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. सध्याच्या काळात पर्यटन क्षेत्रही असेच विकसित होत आहे. अगदी कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत असलेली अनेक ठिकाणे जगप्रसिद्ध आहेत. विदेशी पर्यटकांचीही भारताला पसंती असलेली दिसून येते. मात्र भारतात वरील पैकी आशे काही ठिकाणे आहेत, जिथे चक्क भारतीयांनाच जाण्यास बंदी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues