Icc men’s cricket ranking : ऐतिहासिक कामगिरी..!! आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा डंका
भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 2023 या नव्या वर्षात एकामागोमाग असे आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमधील सर्व सामने जिंकत आहे. हेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाय मध्ये झालेल्याया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील पहिला सामना भारताने जिंकले आहे. त्यानंतर भारतीय संघाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे भारत आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमध्ये नंबर 1 वर पोहोचला आहे.
विश्व क्रिकेटवर भारताचाच जलवा :-
आयसीसीने नुकत्याच सुधारित केलेल्या टीम रँकिंग नुसार टी 20 फॉरमॅटमध्ये भारत 18,445 पॉइंट आणि 267 रेटिंग सह पहिल्या स्थानावर आहे. तर वन डे रँकिंगमध्ये देखील 5,010 पॉइंट आणि 114 रेटिंग सह पहिल्या स्थानी आहे. तसेच टेस्ट रँकिंगमध्येही भारताने वर्चस्व राखले असून यात भारत 3,690 पॉईंट आणि 115 रेटिंग सह पहिल्या स्थानी आहे.
आयसीसी रँकिंगमध्ये भारताचाच दबदबा –
- टीम इडिया कसोटीत नंबर 1
- वनडे मध्ये टीम इंडिया नंबर 1
- टी 20 मध्ये नंबर 1 टीम इंडिया
- टी 20 मध्ये अव्वल फलंदाज – सूर्यकुमार यादव
- वनडेतील नंबर 1 गोलंदाज – मोहम्मद सिराज
- कसोटीतील नंबर 1 अष्टपैलू – रविंद्र जाडेजा
- कसोटीतील नंबर 2 अष्टपैलू खेळाडू – आर अश्विन
- कसोटीती नंबर 2 गोलंदाज – आर अश्विन
- टी 20 तील नंबर 2 अष्टपैलू – हार्दिक पांड्या
याआधी टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 1 कधी बनली होती?
भारतीय संघ 1973 मध्ये प्रथमच कसोटी क्रमवारीत नंबर-1 बनला होता, त्यानंतर टीम इंडियाला बरीच प्रतीक्षा करावी लागली. 2009 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टेस्टमध्ये नंबर-1 बनली होती, ती 2011 पर्यंत त्याच स्थानावर होती. त्यानंतर, 2016 मध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटीत अव्वल स्थान गाठले आणि एप्रिल 2020 पर्यंत सातत्याने पहिल्या क्रमांकावर होते. तेव्हापासून टीम इंडिया सर्वोत्तम-3 मध्ये होती, मात्र आता पुन्हा एकदा ती नंबर-1 वर पोहोचली आहे.