Take a fresh look at your lifestyle.

PM SHRI Yojana : राज्यातील शाळांचं रुपडं बदलणारी ‘पीएमश्री योजना’ राज्यात लागून होणार; मंत्रिमंडळ बैठकीय निर्णय

0

PM SHRI Yojana in Maharashtra : केंद्र सरकारची पीएमश्री योजना ही आता महाराष्ट्रात देखील लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळांच्या अद्यवतीकरणासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. या येजनेअंतर्गत शाळेतील नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ, ग्रंथालय अशा आधिनिक सोयी सुविधा अद्यावत करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि साक्षरता वाढवणं, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना या योजनेअंतर्गत सुचवल्या जातील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाईल.

सप्टेंबर २०२२ मध्ये केंद्राने पंतप्रधान स्कूल फॉर रायजींग इंडीया ही योजना सुरू केली आहे. देशभरातील १४,५९७ शाळा या अंतर्गत सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात याची अंमलबजावणी हवी यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीय निर्णय घेण्यात आला. टप्प्याटप्प्याने या शाळा सुरू करण्यात येतील.

PM SHRI योजना काय आहे?
प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) ही केंद्र सरकारची एक योजना आहे ज्यामध्ये देशातील सध्याच्या शाळांना मॉडेल स्कूल म्हणून विकसित केले जाईल . देशातील १४,५९७ शाळा या योजनेशी जोडल्या जातील .
पहिल्या टप्प्यात ही योजना ५ वर्षांसाठी (२०२२-२०२७) लागू केली जाईल. योजनेचे एकूण अंदाजे अंदाजपत्रक 27 हजार ३६० कोटी रुपये आहे .
या अर्थसंकल्पात केंद्र सरकारचा हिस्सा १८ हजार १२८ कोटी असेल . त्याचबरोबर १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे . या योजनेत सरकारी शाळांचा समावेश करण्यात येणार आहे .

कर्ज आणि सरकारी योजनांच्या बातम्या व्हॉट्सअॅपवर मिळतील, सरकार आणणार ChatGPT सारखी प्रणाली

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues