Take a fresh look at your lifestyle.

5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत, तुम्ही पात्र आहात की नाही? हे कसे पहावे?

0

5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत, तुम्ही पात्र आहात की नाही? हे कसे पहावे?

केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. मग ती कृषी सन्मान निधी योजना असो की बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना. त्याचप्रमाणे प्रत्येकाला उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आयुष्मान योजना सुरू केली होती. याअंतर्गत आयुष्मान कार्डधारकाला 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा मिळते. या योजनेचे नाव आधी आयुष्मान भारत होते, ते बदलून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना करण्यात आले.

या योजनेंतर्गत तुम्हाला रूग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. तथापि, या योजनेंतर्गत प्रत्येकजण आपले उपचार घेऊ शकत नाही. यासाठी तुम्ही पात्र असणे आवश्यक आहे. त्याची पात्रता आता pmjay.gov.in वर जाऊन अगदी सहज तपासली जाऊ शकते. तुमची पात्रता कशी तपासायची? ते स्टेप बाय स्टेप माहिती करून घेऊयात..

पात्रता कशी तपासायची? :
● सर्वप्रथम तुम्ही वेबसाईटवर लॉग इन करा.
● नंतर ‘am i eligible’ या पर्यायावर क्लिक करा.
● आता तुम्हाला मोबाईलवर OTP मिळेल, तो दिलेल्या जागेत भरा.
● यानंतर तुम्हाला 2 पर्याय दिसतील.
● यामध्ये प्रथम तुमचे राज्य निवडा, म्हणजे तुम्ही कुठे राहता ते निवडा.
● दुसऱ्या पर्यायामध्ये मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड नंबर टाका.
● ही प्रक्रिया पूर्ण होताच, तुम्हाला तुमच्या पात्रतेबद्दल कळेल.

हेही वाचा : चोरी झाल्यास गृह विमा काम करतो का? एकदा फायदे तर वाचा..

योजनेबद्दल जाणून घ्या : हे कार्ड बीपीएल म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये कुटुंबाला 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. या कार्डद्वारे तुम्ही कोणत्याही रुग्णालयात उपचार घेऊ शकता. 1949 उपचार या कार्ड अंतर्गत येतात. या योजनेंतर्गत सुमारे 14 कोटी कार्ड बनवण्यात आले असून 18 कोटींहून अधिक लोक यासाठी पात्र ठरले आहेत.

कोणत्या आजारांवर उपचार केले जाऊ शकतात? : तुम्ही हे कार्ड कॅन्सर रेडिएशन उपचार, डेंग्यू आणि इतर तापांवर उपचार, काळ्या बुरशीच्या शस्त्रक्रिया, हृदयाच्या छिद्राचे ऑपरेशन आणि इतर अनेक गंभीर ऑपरेशन्ससाठी वापरू शकता. यासोबतच ब्रेन ट्युमरचा उपचारही या कार्डावर करता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues