Take a fresh look at your lifestyle.

आता वारंवार मोबाईल चार्जिंग करण्याची आवश्यकता नाही; वापरा ही सोपी पद्धत

0

स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. कॉलिंग आणि मेसेजिंग मेल असो किंवा ऑनलाइन पेमेंट या व्यतिरिक्त इतर कामांसाठी मोबाईलचा वापर केला जातो. परंतु, या सर्व गोष्टी करण्यासाठी फोनमध्ये बॅटरी असणे अत्यंत आवश्यक असते. आणि अनेकदा काही महत्त्वाचे कामावेळी फोनची बॅटरी नेमकी तेव्हाच संपते.

परंतु, आता चिंता नको. आम्ही तुम्हाला आज अशा काही आयडिया सांगणार आहोत ज्याचा वापर करून कदाचित तुमची मोबाईल चार्जिंगची समस्या दूर होऊ शकते.

कंपनीचे ओरिजनल चार्जर वापरा :
अनेकदा चार्जर विसरल्यानंतर आपण दुसऱ्या व्यक्तीचा चार्जर घेतो. हे फार चुकीचं आहे. आपल्या मोबाईलला ओरिजनल चार्जरनेच चार्जिंग करायला हवी. इतरांच्या किंवा स्वसतात मिळणाऱ्या चार्जरने चार्जिंग केल्यास बॅटरी लाईफ कमी होऊ शकते. याशिवाय बॅटरीशी संबंधित इतर समस्याही येऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या : कधी विचार केलाय का, भारतात Iphones महाग का? ही आहेत कारणे

चार्जिंग करताना गेमिंग :
मोबाईल चार्जिंगला ठेवून गेम खेळण्याची सवय अनेकांना असते. चार्जिंग सुरु असतानाही अनेकांन गेम खेळण्याचा मोह आवरत नाही. तुम्हाला ही जर अशी सवय असेल तर आत्ताच थांबा. चार्जिंग करताना गेम खेळल्याने मोबाईलची बॅटरी लाइफ कमी होते. यामुळे बॅटरी लवकर डेड होऊ शकते.

पूर्ण चार्ज होऊ द्या :
अनेकदा आपण चार्जिंग करतो पण मोबाईल पूर्ण चार्ज होऊ देत नाही. 30 ते 40 टक्के चार्जिंग झाली रे झाली की मोबाईलवर आपली कामं सुरु करतो. त्यामुळे मोबाईल पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो. अशा स्थितीत जेव्हाही तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावाल तेव्हा तो पूर्ण चार्ज होऊ द्या.

हेही वाचा : सेकंड हॅण्ड स्मार्टफोन खरेदी करतांना घ्या ‘ही’ काळजी

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues