Take a fresh look at your lifestyle.

7 वर्षाआधी केलेली भविष्यवाणी ठरली खरी; अखेर लियोनेल मेस्सीचं ते स्वप्न साकार

0

फिफा विश्वचषक स्पर्धेचा काल अंतिम सामना पार पडला. काल फुटबॉल चाहत्यांना फुटबॉल इतिहासातील एक सर्वात रोमहर्षक असा सामना पाहायला मिळाला. या ब्लॉकबस्टर संडेच्या सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला झाला. आणि अखेर फ्रान्सचा 4-2 अशा फरकाने पराभव करत वर्ल्ड कपवर लियोनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने आपले नाव कोरलं.

दरम्यान, या स्पर्धेच्या सुरुवातीला अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे अर्जेंटिना सेमीफायनल खेळू शकेल का अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु, कालच्या या रोमहर्षक अशा अंतिम सामन्यात लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने जगज्जेतेपद पटकावलं. मात्र, अर्जेंटिनाच्या विजयानंतर आता 7 वर्षा आधीचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या ट्विट मध्ये सांगतिले होते कि, 2022 मध्ये कतारमध्ये 18 डिसेंबरला लियोनेल मेस्सी वयाच्या 34 व्या वर्षी पहिला वर्ल्ड कप जिंकेल. तसंच 7 वर्षांनी माझ्याशी बोला असंही ट्विटमध्ये युजरने म्हटलं होतं. आता ही भविष्यवाणी खरी झाल्याचं म्हणत अनेक युजर्नसी ट्विट शेअर केलं आहे.

दरम्यान, संपूर्ण जगाचे लक्ष फिफा विश्वचषक 2022 कडे लागलं होतं. विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला विजेतेपदासह कोट्यवधी रुपयांची प्राईज मनीही मिळते हे सर्वांना माहिती आहे परंतु कदाचित अनेकांना कि प्रीझ मनी किती असते हे अनेकांना आजही माहिती नाही. फिफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम खूप जास्त आहे आणि केवळ विजेता संघच नाही तर उपविजेता संघही मालामाल होतो. यासोबतच फिफामधील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांनाही एक ठरावीक रक्कम फिफाकडून दिली जाते.

2022 या वर्षात कोणत्या संघाला किती प्राईज मनी?
विजेती अर्जेंटीना : 347 कोटी रुपये (अर्जेंटिना)
उपविजेता फ्रांस : 248 कोटी रुपये (फ्रान्स)
तिसऱ्या क्रमांकावरील टीम : 223 कोटी रुपये (क्रोएशिया)
चौथ्या क्रमांकावरील टीम : 206 कोटी रुपये (मोरक्को)

हेही वाचा : 19 देशांचे 177 उपग्रह प्रक्षेपित करत इस्रोची मागील पाच वर्षात केली बक्कळ कमाई

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues