Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Expensive Food in the world : हे आहेत जगभरातील सर्वात महागडं फूड; किंमत ऐकून तुम्ही होताल थक्क!!

0

आपल्या पैकी अनेक जण खाण्याचे हे फार शौकीन असतात. त्यांना नेहमीच नवनवीन पदार्थ चाखायला आवडत असतात. त्याचप्रमाणे अनेकांना देश-विदेशातील नवनवीन पदार्थ चाखायला फार आवडतात. एखाद्या शहरातील पारंपारिक खाणं आवडतं किंवा एखाद्या देशातील स्ट्रीट फूड. पण जगभरातील काही पदार्थ असे आहेत की, जे तुम्ही तुमची सर्व संपत्ती विकली तरी खरेदी करता येऊ किंवा ते खाण्यासाठी तुम्हाला आतापासूनच साठवण करावी लागणार शकत नाहीत… (The most expensive food in the world)

जगभरात असे काही पदार्थ आहेत की, जे पदार्थ खाण्यासाठीच नाही, तर नुसतं चाखण्यासाठीही कोट्यावधी रूपये खर्च करावे लागतात. जाणून घेऊयात कोणते आहेत हे पदार्थ… (Expensive Junk Food)

  • पिझ्झा : आपल्यापैकी अनेकांना पिझ्झा खायला आवडतो. जगातील सर्वात महागडा पिझ्झा खायचा असेल तर तुम्हाला न्यूयॉर्कचं तिकीट काढावं लागेल. इथल्या पिझ्झाची किंमत साधारण 1.5 लाख रुपये असून त्याचं नाव जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड 24 कॅरेट असं आहे.
  • पॉपकॉर्न : अमेरिकेच्या शिकागोमध्ये बर्को रेस्टॉरंटच्या पॉपकॉर्नची किंमत लाखोंमध्ये आहे. या ठिकाणी 6.5 गॅलन टिनची किंमत 1,87,855 रुपये आहे. हे पॉपकॉर्न 24 कॅरेट सोन्याचे आहेत.
  • बर्गर : तुम्ही 4.50 लाखांच्या बर्गरबद्दल कधी ऐकलंय का? नेदरलँडमधील De Altons Voorthuizen या रेस्टॉरंटमध्ये The Golden Boy नावाचा बर्गर बनवला जातो, जो शेफ रॉबर्ट जे डी वीन बनवत असून त्यात सोनेरी पानांचा समावेश असतो.
  • आईसक्रीम : दुबईच्या स्कूपी कॅफेमध्ये 60 हजारांचं आईसक्रीम मिळतं. हे बनवण्यासाठी इराणमधून केशर आणि ब्लॅक ट्रफल आयात केलं जातं असून यावर 23 कॅरेट सोनं लावण्यात येतं.
  • यूबरी किंग मेलन्स : खरबूजाचा एक प्रकार असणारं हे फळ खाण्यासाठी तुम्हाला लाखो रूपये खर्च करावे लागतात. हे फळ यूबरी किंग मेलन्स या नावाने ओळखलं जात असून याच्या गोड चवीमुळे याची किंमत 14 लाख रूपये आहे. सध्या एका बिजनेसमॅनने हे खरबुज 14,08,991 रूपयांमध्ये खरेदी केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews