Take a fresh look at your lifestyle.

Shinde-fadnavis government : शिंदे-फडणवीस सरकारचा ‘या’ कर्मचाऱ्यांना दणका; सत्तेत आल्यापासून दिला नाही ‘हा’ निधी

0

राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत शिवसेनेचे नेते आणि गत सरकारमध्ये नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपशी सोयरीक करत सत्ता स्थापन केली. मात्र नवं सरकार सत्तेत आल्यापासून एसटी महामंडळाला अपुरा निधी दिला जात असल्याचा आरोप एसटी कामगार नेते यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. (shinde fadnavis government)

एसटी कामगार नेते श्रीरंग बरगे यांच्या म्हणण्यानुसार.., महामंडळाला संपूर्ण निधी शासनाकडून दिला जात नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होणारा भविष्य निर्वाह निधी मधला आणि ग्रॅच्युइटी मधला हिस्सा संबंधित ट्रस्ट कडे जमा होत नसल्याचे चित्र आहे.

एवढेच नव्हे तर शिंदे फडणवीस सरकारने तब्बल साडेसहाशे कोटी रुपये थकवले असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे श्रीरंग बरगे यांनी एक परिपत्रक देखील प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान, या व्यतिरिक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्था, ग्राहक भांडार या संस्थांसुद्धा अनेक जिल्ह्यात असून त्यांचेही कोट्यवधी रुपयांचे देणे बाकी आहे. त्यामुळे या संस्था सुद्धा अडचणीत सापडल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues