Take a fresh look at your lifestyle.

doctors strike : राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर; नवं वर्षात आरोग्य सेवा कोलमडणार!!

0

नव्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली असून राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर (doctors strike) जाणार आहेत. राज्यभरातील साधारण पाच हजारांहून अधिक डॉक्टर संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वीच मार्डने आपल्या मागण्या प्रशासन व राज्य सरकारसमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. एक जानेवारीपर्यंत सरकारने मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे आता मार्डचे डॉक्टर संपावर जाणार आहेत.

काय आहेत निवासी डॉक्टरांच्या मागण्या?

▪️ मार्डने वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती करण्याची मागणी
▪️ वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील वसतिगृहांची दुरवस्था करावी
▪️ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची हेळसांड होत असल्याने सरकारने लक्ष घालून त्या गोष्टी थांबवाव्या
▪️ सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची अपुरे पदे तातडीने भरावे
▪️ महापालिका आणि सर्व शासकीय रुग्णालयात महागाई भत्ता आणि थकबाकी तत्काळ लागू करावे

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues